शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

समान पाणी योजनेसाठी पुन्हा त्याच कंपन्या? पाणी योजना फेरनिविदा, मुंबईतून निरोपाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 02:20 IST

समान पाणी योजनेच्या फेरनिविदेसाठी यापूर्वीच्या मूळ निविदेला प्रतिसाद दिलेल्या व त्यातूनच वादग्रस्त झालेल्या कंपन्यांनाच रेड कारपेट टाकले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे : समान पाणी योजनेच्या फेरनिविदेसाठी यापूर्वीच्या मूळ निविदेला प्रतिसाद दिलेल्या व त्यातूनच वादग्रस्त झालेल्या कंपन्यांनाच रेड कारपेट टाकले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रजेवर असताना आयुक्तांनी घाई करून अटी, शर्ती नसलेली फेरनिविदा प्रसिद्ध केली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.दरम्यान, यावर नगरसेवकांसह अनेकांनी आक्षेप घेतले असून फेरनिविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी थेट नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे. ज्या विभागाची निविदा आहे, त्याच विभागाच्या प्रमुखाच्या स्वाक्षरीने ती प्रसिद्ध केली जात असते. अंदाजपत्रक समितीने फेरनिविदा मंजूर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी रजेवर गेले होते. त्याचवेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वत: पुढाकार घेत फेरनिविदा प्रसिद्धीला दिली. त्यात इतकी घाई करण्यात आली आहे. अटी व शर्तींचा समावेशच निविदेत नाही. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही निविदा उपलब्ध नाही. निविदांची विक्री व दाखल करण्याच्या तारखेत चूक झाली आहे. २७ डिसेंबरपर्यंत विक्री व २८ नोव्हेंबरला दाखल करणे असे झाले आहे.अधीक्षक अभियंत्याच्या गैरहजेरीत, अटी, शर्तींचा समावेश नसताना फेरनिविदा प्रसिद्ध करण्यामागे यापूर्वीच्या कंपन्यांनाच संधी मिळावी, असा हेतू असल्याची चर्चा करण्यात येत आहे. यापूर्वीच्या मूळ निविदेत २ हजार ५४७ कोटी रुपयांच्या कामाचे चार भाग करण्यात आले होते. फेरनिविदा २ हजार ३०७ कोटी रुपयांची असून या कामाचे आता सहा भाग करण्यात आले आहेत.स्पर्धा झाल्याचे दाखवलेयापूर्वीच्या निविदेला तीन कंपन्यांनी साखळी करून २ हजार ५४७ कोटी रुपयांच्या चार कामांसाठी निविदा दाखल केल्या होत्या. प्रत्येक कामात एका कंपनीची निविदा कमी रकमेची (मूळ किमतीपेक्षा जास्त दराने दाखल केलेली) असा प्रकार करण्यात आला होता. त्यामुळे स्पर्धा झाली आहे, असे दाखवून कमी किमतीच्या कंपनीला काम द्यायचे, असा घाट घातला जात होता.त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. त्याचा रोख थेट मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकेंद्राकडे जात होता. त्यामुळेच ती निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता फेरनिविदा काढतानाही तिथूनच हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आहे.पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा आदेश व २४ तास पाणी योजनेच्या फेरनिविदेला प्रसिद्धी या दोन गोष्टीत सुसूत्रता आहे. मतदार आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी वागत आहेत. आम्ही सर्व गोष्टी जनतेसमोर खुल्या करून त्यांचे षड्यंत्र हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही.चेतन तुपे, विरोधी पक्षनेते महापालिकाआयुक्तांनी पूर्वीची व नव्याने केलेली अशा दोन्ही निविदा जनतेच्या माहितीसाठी म्हणून प्रसिद्ध करायला हव्या होत्या. तसे न करता थेट प्रसिद्धी देणे संशयास्पद आहे. या सर्वच व्यवहारांभोवती भ्रष्टाचाराचे धुके दाटले असून त्याचे निराकरण करावे व तोपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित करावी.विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचसल्लागार कंपनीला डीपाआर तयार करण्याचे, काम करून घेण्याचेच पैसे महापालिकेने अदा केले आहेत. असे असताना आता ठेकेदाराकडून काम करून घेण्याचा अर्थच समजत नाही. पूर्वीची व आताचीही निविदा प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यामुळेच आम्ही नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे फेरनिविदाही रद्द करण्याची व या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, माजी नगरसेवक

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे