शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सलाम पोलीस ; सेवानिवृत्त झाले ड्युटीवर ; नोकरीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 20:58 IST

सेवानिवृत्तीजवळ आली की सर्व जण असलेल्या सुट्ट्या संपविण्याच्या मागे लागतात, तर काही ऑफिसमध्ये केवळ शरीरानेच असतात़ असे असताना शहर पोलीस दलातील तीन अधिकारी मात्र, सेवानिवृत्तीच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या कर्तव्यावर हजर होते़.

पुणे : सेवानिवृत्तीजवळ आली की सर्व जण असलेल्या सुट्ट्या संपविण्याच्या मागे लागतात, तर काही ऑफिसमध्ये केवळ शरीरानेच असतात़ असे असताना शहर पोलीस दलातील तीन अधिकारी मात्र, सेवानिवृत्तीच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या कर्तव्यावर हजर होते़. त्यातील एका जणाला तर वरिष्ठ थेट रस्त्यावर बंदोबस्तात असताना रात्री साडे सात वाजता निरोप दिला व तसे वरिष्ठांना कळविले.

दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोलीस आयुक्तालयात सेवा निवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांचा कुटुंबियांसमवेत स्नेह मेळावा आयोजित केला जातो. त्यात स्वत: पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या आजवरच्याकामाबाबत सत्कार करुन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. यंदाचा मार्च महिना अपवाद ठरला. कोरोना विषाणूमुळे शहरात लॉक डाऊन असल्याने हा समारंभ झाला नाही. त्यातील काही जण तर चक्क शेवटच्या दिवशीही सायंकाळपर्यंत ड्युटीवर होते.

मुंढवा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार बापू सुदाम शिंदे हे ताडी गुत्ता चौकात नाकाबंदीवर शेवटच्या दिवशी होते. संपूर्ण दिवस ड्युटी त्यांनी चौकात नाकाबंदी केली. सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हे नाकाबंदीची तपासणी करीत ३१ मार्चला सायंकाळी सव्वा सात वाजता चौकातच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चौकातच बंदोबस्तावर असताना विधाते यांनी बापू शिंदे यांच्यासमवेत फोटो काढला आणि तेथेच पोलीस दलातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. तसा निरोप त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.एस टी बस भरधाव चालवून ९ जणांचे प्राण घेणाऱ्या संतोष माने खटल्यात बापू शिंदे यांनी न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यात संतोष माने याला फाशीची शिक्षा झाली होती. शिंदे हे १९८१ मध्ये पोलीस शिपाई म्हणून पुणे शहर पोलीस दलात भरती झाले. ३९ वर्षाच्या सेवेनंतर ते कर्तव्य बजावत निवृत्त झाले. 

पोलीस उपनिरीक्षक सुभाष तागड हे सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत बंदोबस्तावर होते. अडीच महिन्यांची रजा शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे शेवटच्या दिवसांपर्यंत कार्यरत होते. सध्या ते गुन्हे शाखेत नेमणूकीला होते. निवृत्तीचा दिवस असताना त्यांनी ३० मार्चला रात्री मार्केटयार्डमध्ये रात्रपाळी केली़. रात्रभर भाजीपाला घेऊन येणारे ट्रक, टेम्पो यांच्यामुळे गर्दी होऊ नये, म्हणून त्यांना थांबून थांबून सोडण्याचे काम सकाळपर्यंत केले. त्यानंतर कार्यालयात जाऊन आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर व इतर बाबी सुपूर्त केल्या. सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली़. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ सोडणवर हेही सेवानिवृत्तीच्या दिवशी दिवसभर पोलीस नियंत्रण कक्षात आपल्या कर्तव्यावर होते. पूर्ण ८ तासाची ड्युटी केल्यानंतर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरोप दिला.  

टॅग्स :PoliceपोलिसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या