जुन्नर : ६८ वा प्रजासत्ताक दिन जुन्नरमध्ये उत्साहात झाला. जुन्नर तहसील कार्यालयात जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष श्यामराव पांडे, उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार, शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी, नगरसेवक आविन फुलपगार, समीर भगत, फिरोज पठाण, अविनाश करडीले, स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर काजळे, वल्लभ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सी. बी. गांधी, मोहिनीताई बुट्टे-पाटील, माऊली शिंदे, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.या वेळी पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. जुन्नर नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला व हुतात्मा स्मारकाला जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजवंदन करण्यात आले.जुन्नर नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात जुन्नर नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जुन्नर पोलीस ठाणे आवारात जुन्नर पोलीस ठाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. (वार्ताहर)
जुन्नर तहसील कार्यालयासमोर सलामी
By admin | Updated: January 28, 2017 00:02 IST