शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या कार्यक्रमाला ध्वनीक्षेपक नाकारा, नगरसेवकाचे पोलिसांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 22:36 IST

येत्या शनिवारी होणाऱ्या सलमान खानच्या कार्यक्रमामुळे परीक्षा सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी  55 डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा ध्वनीक्षेपक बसविण्यास परवानगी देण्यात येवू नये, असे पत्र स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला दिले आहे.

पुणे : येत्या शनिवारी होणाऱ्या सलमान खानच्या कार्यक्रमामुळे परीक्षा सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी  55 डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा ध्वनीक्षेपक बसविण्यास परवानगी देण्यात येवू नये, असे पत्र स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला दिले आहे.

येत्या शनिवारी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सलमान खान यांचा 'दबंग टूर' कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र त्या संदर्भात स्थानिक नगरसेवक बालवडकर यांनी आवाजाच्या संदर्भात पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली आहे. शिवजयंती, दहीहंडी, गणेशोत्सव काळात पोलिसांनी ध्वनी मर्यादा ओलांडलेल्या मंडळांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशावेळी लाखो रुपये कामावणाऱ्या आयोजकांना आश्रय दिला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या तरी 5 ते 9 वीच्या परीक्षा सुरू असल्याने परवानगी नाकारावी, असे पत्र त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

याबाबत बालवडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अशा खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना घेऊन बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Salman Khanसलमान खानPuneपुणे