‘सॅलसबरी पार्क’ होणार हॉकरमुक्त प्रभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:36 AM2018-05-19T01:36:47+5:302018-05-19T01:36:47+5:30

केंद्र शासनाच्या हॉकर पॉलिसीनुसार पुणे शहर पथारीमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत.

'Salisbury Park' to be held in Hokkar Mukar division | ‘सॅलसबरी पार्क’ होणार हॉकरमुक्त प्रभाग

‘सॅलसबरी पार्क’ होणार हॉकरमुक्त प्रभाग

Next

पुणे : केंद्र शासनाच्या हॉकर पॉलिसीनुसार पुणे शहर पथारीमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये ‘सॅलसबरी पार्क’ हा प्रभाग शहरातील पहिला हॉकरमुक्त प्रभाग करण्याचे नियोजन करण्यात आले असून, या प्रभागातील पथारी व्यावसायिकांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रम विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
केंद्र शासनाने सन २०१०मध्ये राष्ट्रीय फेरीवाले धोरण जाहीर केले. यानुसार शहरातील विविध रस्त्यांवर व्यावसाय करणाऱ्या
पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर आली आहे. या राष्ट्रीय फेरीवाले
धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये शहरात तब्बल २० हजारांपेक्षा जास्त पथारी व्यावसायिक असल्याचे समोर आले. या पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करून शहर हॉकरमुक्त करण्यात येणार आहे.
यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील काही ठराविक रस्ते, चौक निश्चित करून टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रत्येक वेळी पथारी व्यावसायिक व स्थानिक लोकप्रतिनिधीचा विरोध यांमुळे हॉकरमुक्त केवळ कागदावरच राहिले आहे. परंतु, आता सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचा सॅलसबरी पार्क- महर्षिनगर हा प्रभाग हॉकरमुक्त करण्यात येणार आहे.
>४०० व्यावसायिक
या प्रभागामध्ये सुमारे ३०० ते ४०० पथारी व्यावसायिक असून, येत्या काही महिन्यांत प्रभागातील सर्व पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करून शहरातील पहिला हॉकरमुक्त प्रभाग करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Salisbury Park' to be held in Hokkar Mukar division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.