दीड कोटीच्या दागिन्यांचा अपहार करणाऱ्या सेल्समनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:38+5:302021-02-14T04:12:38+5:30

पुणे : वाघोली येथील एम. बी. अष्टेकर ज्वेलर्स या दुकानातून तब्बल दीड कोटी रुपयांचे ३ किलो ११ ग्रॅम सोन्याचे ...

Salesman arrested for embezzling Rs 1.5 crore worth of jewelery | दीड कोटीच्या दागिन्यांचा अपहार करणाऱ्या सेल्समनला अटक

दीड कोटीच्या दागिन्यांचा अपहार करणाऱ्या सेल्समनला अटक

Next

पुणे : वाघोली येथील एम. बी. अष्टेकर ज्वेलर्स या दुकानातून तब्बल दीड कोटी रुपयांचे ३ किलो ११ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा अपहार करणा-या सेल्समनला लोणी कंद पोलिसांनी अटक केली.

प्रवीण रामभाऊ मैड (वय ३३, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे अटक केलेल्या सेल्समनचे नाव आहे. याप्रकरणी तुषार अष्टेकर (वय३५, रा. सदाशिव पेठ) यांनी लोणी कंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान घडला.

वाघोली येथील अष्टेकर यांच्या सराफी दुकानात प्रवीण मैड हा सेल्समन म्हणून कामाला होता. त्याच्याकडे अष्टेकर यांनी सोन्याचे काऊंटर सांभाळायला दिले होते. त्यादरम्यान त्याने १ कोटी ४९ लाख रुपयांचे ३ किलो ११ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. लोणी कंद पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

Web Title: Salesman arrested for embezzling Rs 1.5 crore worth of jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.