बावडा : अकलूज येथे भरलेल्या घोडेबाजारात आजअखेर ६८० घोड्यांची विक्री झाली आहे. २१ लाख रुपयांना एका घोड्याची विक्री झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.या घोडेबाजारात देशाच्या विविध भागांतून घोडे विक्रीसाठी आले आहेत. संपूर्ण खरेदी आॅनलाईन केली जात आहे. तसेच, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारीवगार्ला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे काकडे यांनी सांगितले. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घोडेबाजाराला भेट देऊन घोडेमालक व खरेदीदारांशी चर्चा केली. अकलूजच्या बाजारात हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, गोवा, दिल्ली, राजस्थान, तमिळनाडू आदी राज्यांतून हजारो घोडे विक्रीला आले आहेत. घोड्यांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची अनेक दुकाने या ठिकाणी थाटण्यात आली आहेत, अशी माहितीही सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली. (वाार्ताहर)
अकलूजला ६८० घोड्यांची विक्री
By admin | Updated: November 16, 2016 02:51 IST