शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
3
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
4
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
5
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
6
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
7
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
8
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
9
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
10
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
11
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
12
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
13
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
14
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
15
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
16
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
17
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
18
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
19
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
20
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 02:00 IST

कोल्हापूरच्या भवानी मंडप प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ७५ स्वराज्यरथ

पुणे : कोल्हापूरच्या भवानी मंडप प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ७५ स्वराज्यरथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... शिवगर्जना ढोल-ताशा पथकाचा रणगजर... पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर... हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवजयंतीनिमित्त शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याच्या सुरुवातीला लालमहाल चौकात अमर जवान स्तंभ उभा करून पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समितीचे संस्थापक अमित गायकवाड, श्रीमंत छत्रसाल महेंद्रसिंग महाराज, राघवेंद्रसिंग महाराज बुंदेला, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, बीव्हीजीचे ग्रुपचे हणमंत गायकवाड, आमदार शशिकांत शिंदे, उद्योजक युवराज ढमाले, रोहित पवार, प्रवीण तरडे, टीम मुळशी पॅटर्न, समन्वयक सुनील मारणे तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ-शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मिरवणुकीचे यंदा ७ वे वर्ष आहे.४सोहळ्यामध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर, हैबतराव शिळीमकर, रणमर्द संभाजी कोंढाळकर, सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या पुतळ्याचे व बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार यांच्या तैलचित्राचे अनावरण यावेळी झाले.शिवाजी महाराजांचा जयजयकारपुणे - हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा अखंड जयजयकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करत, पारंपरिक वाद्य आणि शिवभक्तांच्या उत्साही वातावरणात पुणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भवानी मातेचे पूजन करून व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता भवानी माता मंदिर भावनीपेठ या ठिकाणाहून सुरू झालेल्या या मिरवणुकीचे विसर्जन एसएसपीएम कॉलेज जवळ झाले. या मिरवणुकीसाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाजेड, श्रीनाथ भिमाले, अर्चना पाटील, अविनाश बागवे, अजय खेडेकर, कमल व्यवहारे, मराठा सेवा संघ अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे