कविसंमेलन अध्यक्ष पदी सागर काकडे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:14+5:302020-11-26T04:27:14+5:30

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन अध्यक्ष ...

Sagar Kakade elected as President of Kavisammelan | कविसंमेलन अध्यक्ष पदी सागर काकडे यांची निवड

कविसंमेलन अध्यक्ष पदी सागर काकडे यांची निवड

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन अध्यक्ष पदी प्रसिद्ध युवा कवी सागर काकडे यांची निवड करण्यात आली आहे.

शुक्रवार (२७ नोव्हेंबर) महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी पुणे येथे हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. कवी सागर काकडे हे गेली सात वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा माणसाच्या ''''''''सोयीचा देव'''''''' हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. या संग्रहास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कवितेतून लोकांचे प्रबोधन केले आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी दिली.

.......

Web Title: Sagar Kakade elected as President of Kavisammelan