शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे होणार ‘सेफ्टी आॅडीट’ : अपघात मुक्तीसाठी पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:43 IST

महापालिकेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये शहरातील २४ मीटर पेक्षा अधिक रुंद असलेल्या सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्यात आले होते. त्याअंतर्गत रस्त्यांची रचना, वाहतुकीचा ताण तसेच आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन हे आॅडीट करण्यात आले.

ठळक मुद्दे२ कोटी ४९ लाख रुपये देण्याच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता,जानेवारी २०१७ मध्ये शहरातील सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट

 स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतापुणे: रस्त्यांची वाहन क्षमता वाढवितानाच अपघातमुक्त करण्यासाठी  महापालिकेच्या वतीने आता ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या तब्बल ८०० किलो मीटर रस्त्यांचे ‘सेफ्टी आॅडीट’ करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.  स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले की, यापूर्वी रस्त्यांचे आॅडीट केलेल्या कंपनीलाच दुस-या टप्प्यातील रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या कंपनीला प्रती किलोमीटरसाठी २४ हजार ९०० रुपये देण्यात आले होते. आता देखील याच दरानुसार पुढील काम देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला २ कोटी ४९ लाख रुपये देण्याच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता  दिली आहे . यामध्ये संबंधित कंपनीने दुस-या टप्प्यातील कामासाठी ५ टक्के वाढीव रक्कम देण्याची मागणी केली होती. परंतु, स्थायी समितीच्या वतीने ही मागणी फेटाळून लावली असल्याचे मुळीक यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये शहरातील २४ मीटर पेक्षा अधिक रुंद असलेल्या सुमारे २०० किलो मीटर रस्त्यांचे सेफ्टी आॅडीट करण्यात आले होते. त्याअंतर्गत रस्त्यांची रचना, वाहतुकीचा ताण तसेच आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन हे आॅडीट करण्यात आले. या आॅडीटमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार, महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांमध्ये आवश्यक त्या तरतूदीनुसार, वेळोवेळी बदल केले जात आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने पुढच्या टप्प्यात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदी असलेल्या सुमारे १ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी आणखी ८०० किलोमीटर रस्त्याचे सेफ्टी आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा न काढता सध्या नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनी बरोबरच महापालिकेचा पाच वर्षांचा करार असल्याने तसेच झालेल्या कामाबाबत महापालिका आयुक्तांनी आणखी पुन्हा काम देण्यास सहमती दर्शविल्याने या पूर्वीच काम केलेल्या सल्लागाराच्या माध्यमातून हे वाढीव काम करण्याचा प्रस्ताव पथ विभागाने स्थायी समिती समोर ठेवला आहे. या प्रस्तावाला समितीने अखेर मान्यता दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा