शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

साध्वी, महाराज, स्वामी संसदेत पाठवून तिथे काय कुंभमेळा भरवायचा आहे का ? सक्षणा सलगर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 19:12 IST

भाजपवाल्यांनो संसदेवर काय जातीचे लेबल लावायचे आहेत का

ठळक मुद्देसंसदेवर जातीचे लेबल लावायचे आहेत का ? - अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं

चाकण :  ही निवडणूक जातीची नाही, तर मातीची आहे. भाजपवाल्यांनो संसदेवर काय जातीचे लेबल लावायचे आहेत का? ज्या करकरेंनी मुंबईसाठी आपले प्राण दिले, त्यांना माझ्या शापाने मरण आले, असे म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वीला भाजपाने उमेदवारी दिली, त्यांना चालतं का हे ? फडणवीसांच्या काळात भीमा कोरेगाव घडलं, का घडलं ? त्याचे उत्तर द्या.. तुम्ही जाती जातीत विष पेरलं. मला प्रश्न पडलाय विकासासाठी उमेदवार पाठवायचे सोडून प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी हे संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. चाकण येथील मार्केट यार्डात राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, अमोल कोल्हेंची जात काढू नका, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला रजनीकांत, साऊथच्या कलाकार चालतात, आमचे कोल्हे नाही चालत का ? अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं. महिलांचे धोरण पवार साहेबानी आणले. बेटी बचाव चे अभियान संपूर्ण महारार्ष्ट्रात सुप्रिया सुळेंनी राबवलं. राष्ट्रवादी लोकांशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे. जाती पातीचे राजकारण करणा?्यांनो मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणी विरोध केला, हे उकरून काढू का ?यावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे, दिलीप मोहिते, एस. पी. देशमुख, अनिल राक्षे, हिरामण सातकर, संभाजी खराबी, शांताराम भोसले, डी. डी. भोसले, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, नूतन आवटे, हेमलता टाकळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :ChakanचाकणNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा