शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Pune: साधु वासवानी पुल पाडणार, शनिवारपासून पर्यायी व्यवस्था

By राजू हिंगे | Updated: January 3, 2024 19:00 IST

उड्डाणपूल धोकादायक अवस्थेतच असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी दिला आहे

पुणे: साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक अवस्थेतच असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे  या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.  आता हा पुल पाडण्यात येणार असुन प्रायोगिक तत्त्वावरती ६ जानेवारीपासून पुढील दहा ते पंधरा दिवस प्रायोगिक तत्त्वावर  वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.

साधू वासवानी पुलाचे आयुर्मान ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. पालिकेने साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक बनल्यानंतर त्यावर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेकडून गेले वर्षभर त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. महापालिकेने सद्यस्थितीतील पुलाची डागडुजी केली असली तरी स्लॅबचे सिमेंट पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पुल पाडण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने हा पुल जड वाहतुकीसाठी बंद  केला आहे. प्रायोगिक तत्त्वावरती ६ जानेवारीपासून पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीची पर्याय व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर रोड कोरेगाव पार्क, बंडगार्डन, कौन्सील हॉल , मोरवाडा या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. काही रस्त्यावर एकरी वाहतुक तर काही रस्त्यावर  नो एन्ट्री करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुणे पोलीसचा वाहतुक विभाग जाहीर करणार आहे, असे पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडीcarकारbikeबाईक