शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत सदानंदाचा यळकोट...! शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:32 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता.

जेजुरी - तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता. शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता झाली.माघ पौर्णिमेला जेजुरीत शिखरी काठ्यांची यात्रा भरते. संगमनेरकर होलम, सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर या मानाच्या तीन शिखरी काठ्या आणि त्यांच्या सोबत असणा-या इतर ५०हून अधिक प्रासादिक शिखरी काठ्या कुलदैवताची वर्षातून एकदा देवभेट घेत असतात.सकाळी १० वाजता सुपेकर खैरे यांच्या शिखर काठीने गडाकडे कूच केली. छत्री मंदिर, तसेच होळकरांचा मान स्वीकारून मारुती मंदिरमार्गे महाद्वार पथावरून वाजतगाजत मिरवणुकीने गडाकडे निघाली. सोबत स्थानिक होळकरांची शिखर काठी होतीच. मानाच्या या दोन्ही शिखरी काठ्यांसमवेत इतरही प्रासादिक काठ्यांसह दुपारी १२ वा. गडावर पोहोचल्या. या वेळी देवाचा जयघोष आणि भंडार खोबºयाच्या उधळणीत काठ्यांची देवभेट झाली. सुपेकर खैरेंच्या काठीचे मानकरी शहाजी खैरे, सुरेश खैरे, शरद खैरे, होळकर काठीचे मानकरी बबनराव बयास, सतीश गोडसे, बाळू नातू आदींचा देवसंस्थानकडून सत्कार करण्यात आला.मानाची काठीदुपारी संगमनेरकर होलम राजाची मानाच्या शिखर काठीने मुक्काम स्थळावरून गडाकडे कूच केली. ऐतिहासिक छत्री मंदिर, होळकरांचा मान घेऊन मारुती मंदिरमार्गे महाद्वार पथावरून प्रासादिक शिखरी काठ्यांसह मानाची ही काठी वाजतगाजत ४ वाजता गडावर पोहोचली.या वेळी संगमनेरहून आलेल्या सुमारे २० हजार भाविकांनी देवाचा जयघोष करीत मोठ्या प्रमाणावर भंडार खोबºयाची उधळण केली. याच जयघोषात काठीने गडकोटातील मुख्य मंदिराच्या शिखराला स्पर्श करून देवभेट घेतली.या नंतर मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा, तुषार सहाणे, संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडे, अ‍ॅड. अशोक संकपाळ, सोलिसिटर प्रसाद शिंदे तसेच ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, रमेश राऊत यांनी मल्हारी मार्तंड होलम राजा सार्वजनिक काटकर मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काटे, उपाध्यक्ष भिकाजी गुंजाळ, विलास गुंजाळ, दिलीप गुंजाळ, निवृत्ती लांडगे, सीताराम अभंग, गोविंद भरीतकर आदींना फेटा व देवाचा फोटो, श्रीफळ देऊन सत्कार केला.यानंतर शिखरी काठ्यांनी माघारीचे प्रस्थान ठेवले. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवसांची यात्रा पोलिसांच्या नियोजनामुळे शांततेत पार पडली.

टॅग्स :Puneपुणे