शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात सोमवारी रंगणार ‘सचिन’ची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 20:41 IST

तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून‘मिशन यंग अ‍ॅन्ड फीट इंडिया’ची सुरुवात केली जाणार आहे.

ठळक मुद्देमिशन यंग अ‍ॅन्ड फिट इंडिया : खेळांना उत्तेजन देण्यासाठी उपक्रमप्रसिध्द क्रीडा समीक्षक सुनंदन लेले तेंडुलकर यांची मुलाखत घेणार नागराज मंजुळे यांच्या चित्रपट सेटने सहा महिन्यांपासून मैदान उपलब्ध करण्यात अपयश 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन यंग अ‍ॅण्ड फिट इंडिया’ ही मोहीम सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २१ मे)रोजी होणार आहे. यावेळी प्रसिध्द क्रीडा समीक्षक सुनंदन लेले तेंडुलकर यांची मुलाखत घेणार आहेत. विद्यापीठ आवारातील आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात ही मुलाखत रंगणार आहे. भारतातील तरुण पिढी विविध कारणांमुळे मैदानाकडे फारशी वळत नाही. अलिकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील एक तृतीयांश तरुण मुले-मुली कोणताही खेळ खेळत नाहीत किंवा व्यायामही करत नाही. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून‘मिशन यंग अ‍ॅन्ड फीट इंडिया’ची सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंंद शाळीग्राम यांनी दिली. या वेळी क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डॉ. दीपक माने हेही उपस्थित होते. ‘मिशन यंग अ‍ॅन्ड फिट इंडिया’ या कार्यक्रमात शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निमंत्रित केलेले महाराष्ट्रातील सुमारे २५० शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष आणि क्रीडा संचालक सहभागी होणार आहेत. केवळ निमंत्रितांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच, मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. मीनल सोहनी यांची मनोगते होतील. ..............सहा महिन्यांपासून मैदान उपलब्ध करण्यात अपयश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानामध्ये चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपट सेटने मैदानाचा मोठा भाग व्यापला आहे. विद्यार्थ्यांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करूनही अद्याप ते उपलब्ध होऊ शकलेले नाही. एकीकडे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन यंग अ‍ॅन्ड फीट इंडिया’ हा कार्यक्रम राबविला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावरील अतिक्रमण दूर करण्याकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष होत आहे. या विसंगतीकडे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांचे लक्ष वेधले असता कुलगुरू डॉ. नितीन करमळकर याबाबत उत्तर देऊ शकतील असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेSachin Tendulkarसचिन तेंडूलकरuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर