मुसळधार : रस्ते पाण्याखाली, झाडे पडलीझोडपले

By Admin | Updated: May 28, 2014 01:57 IST2014-05-28T01:57:42+5:302014-05-28T01:57:42+5:30

वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने आज पुणे व उपनगरांना झोडपून काढले. दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली.

Rusty: The roads covered the water, the trees fell | मुसळधार : रस्ते पाण्याखाली, झाडे पडलीझोडपले

मुसळधार : रस्ते पाण्याखाली, झाडे पडलीझोडपले

पुणे : वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने आज पुणे व उपनगरांना झोडपून काढले. दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे पडली होती. पावसामुळे हवेतील गारवा वाढल्याने गेल्या आठवड्यापासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत कात्रजमध्ये २३.४ मिमी आणि शहराच्या मध्यवर्ती भागात २.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून येऊन वादळी वारा सुटला आणि जोरदार पावसास सुरुवात झाली. शहराच्या विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी- जास्त होते. पाऊस आणि सोसाट्याचा वारा यांमुळे शहारात ठिकठिकाणी झाडांच्या छोट्या-मोठ्या फांद्या पडल्या होत्या. सुमारे दोन तास शहरात मुसळधार पाऊस पडत होता. कात्रज, बिबवेवाडी, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, येरवडा, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी आदी उपनगरांमध्येही जोरदार पाऊस झाला. या भागातील अनेक रस्तेही पाण्याखाली गेले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rusty: The roads covered the water, the trees fell