शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

रुपीच्या बँक आरबीआयमध्ये होणार विलीन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:09 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधे रुपी बँकेचे विलिनीकरण करावे याचा संयुक्त प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधे रुपी बँकेचे विलिनीकरण करावे याचा संयुक्त प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार बँकेतील ठेवीदार-खातेदारांना आपली संपूर्ण रक्कम एक ते पाच वर्षांत मिळण्याची हमी देण्यात आली आहे. आरबीआय देखील या प्रस्तावाला सकारात्मक असल्याने ५ लाख ८७ हजार ७५२ खातेदार-ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सीए सुधीर पंडित यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आर्थिक अनियमिततेमुळे फब्रुवारी २०१३ साली आरबीआयने रुपी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळे खातेदारांना आपल्या खात्यातून एक हजार रुपयेच काढण्याचे बंधन आहे. या कालावधीत जवळपास सहा राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी विलिनीकरणासाठी स्वारस्य दाखविले होते. काहींनी आर्थिक पडताळणी (ड्यू डिलिजन्स) देखील पूर्ण केली. मात्र, हा प्रस्ताव फारसा पुढे जाऊ शकला नाही. यंदा प्रथमच आरबीआयकडे विनिलीनकरणाचा प्रस्ताव दाखल झाला आहे.  या बाबत माहिती देताना अनास्कर म्हणाले, राज्य बँक आणि रुपी बँकेने संयुक्त प्रस्ताव राज्यसरकारला १३ जानेवारी २०२० रोजी सादर केला. हा प्रस्ताव राज्यसरकारने अंतिम मंजुरीसाठी १७ जानेवारीला आरबीआयला पाठविला आहे. हा प्रस्ताव अंतिम होण्यासाठी राज्य बँकेला किरकोळ बँकींगचा परवाना मिळणे आवश्यक आहे. विलिनीकरणानंतर राज्य बँकेची स्थिती कशी राहिल याचा अभ्यास केल्यानंतर परवान्याचा निर्णय घेतला जाईल, असे आरबीआयने कळविले आहे. विमा महामंडळाकडून पाचशे कोटी रुपये मिळणे अपेक्षित असून, राज्य बँक ९८० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. बँकेकडे पुरेशी भांडवल पर्याप्तता असल्याने विलिनीकरणानंतरही राज्य बँकेची स्थिती मजबूत राहिल. त्यामुळे हा प्रस्ताव आरबीआय मान्य करेल असा विश्वास आहे. विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक  :     

बँकेतील आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे वगळून राज्य बँक संपूर्ण तोट्यासह बँकेचे विलिनीकरण करुन घेईल. बँकेवरील आर्थिक निर्बंधाची मुदत येत्या फेब्रुवारी महिना अखेरीस संपत आहे. त्या पुर्वी आरबीआयची प्रस्तावास मान्यता मिळणे अपेक्षित आहे. आरबीआयच्या मान्यतेनंतर विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. विलिनीकरणामुळे एकाही ठेवीदाराला आपली रक्कम सोडून द्यावी लागणार नाही.

टॅग्स :Rupee Bankरुपी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकEconomyअर्थव्यवस्था