शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार; चला, महामॅरेथॉनमध्ये धावू या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:07 IST

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार आहे. ‘लोकमत’ने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे घोषवाक्य घेऊन ‘महामॅरेथॉन’सारखा स्मार्ट उपक्रम राबविला आहे.

पुणे : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार आहे. ‘लोकमत’ने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे घोषवाक्य घेऊन ‘महामॅरेथॉन’सारखा स्मार्ट उपक्रम राबविला आहे. पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी संधी आहे. चला या महामॅरेथॉनमध्ये धावू या, अशा शब्दांत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी या शर्यतीत सहभागी होण्याबाबत आवाहन केले.‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअ‍ॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉनचे येत्या १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.जगताप म्हणाले, आरोग्य चांगले, तर सर्व काही आपण साध्य करू शकतो. त्यासाठी कुटुंबातील लहान, तरुण, वृद्ध आदी सर्वांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज पहाटे धावायला हवे. आपल्या प्रकृतीला साजेसा व्यायाम नेहमी केला पाहिजे. त्यासाठी आळस करून चालणार नाही. ‘लोकमत’ने आपणा सर्वांना या महामॅरेथानॅच्या निमित्ताने धावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘लोकमत’ने नागरिकांच्या आरोग्यासंबंधी एक पाऊल पुढे टाकून ‘लोकमत महामॅरेथॉन’ची सुरुवात गेल्या वर्षी केली होती. ‘लोकमत’तर्फे या महोत्सवाचे आयोजन होत असताना यात आम्हीही ‘लोकमत’बरोबर खांद्याला खांदा लावून सहभागी झालो आहोत. लहान मुले मोबाईल तसेच इतर गॅझेटवर खेळत आहेत. त्यामुळे चांगली सुदृढ पिढी निर्माण होणार नाही. हा उपक्रम भावी पिढी घडविण्यासाठी उत्तम पर्याय देणारा आहे. या पिढीला मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी ‘महामॅरेथॉन’ चांगली पर्वणी आहे. मी व माझे कुटुंबीय या ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होत आहोत. तुम्हीदेखील सहभागी व्हा. 

टॅग्स :Puneपुणे