शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कऱ्हा पात्रात खडखडाट

By admin | Updated: April 26, 2017 02:45 IST

पुरंदर तालुक्याची जीवनदायिनी व साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दर्जेदार लेखणीद्वारे अजरामर केलेली कऱ्हा नदी

गराडे : पुरंदर तालुक्याची जीवनदायिनी व साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दर्जेदार लेखणीद्वारे अजरामर केलेली कऱ्हा नदी यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात कोरडी ठणठणीत पडली आहे. गराडे तलावातून शेतीस देण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविण्यात आले आहे. फक्त धरणातील व धरणाखालील विहिरीत पाणीसाठा असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे. गराडे परिसरातील पाझर तलाव, बंधारे, विहिरी आटल्याने पाणीटंचाई भासू लागली आहे. गुरे-ढोरे, बकरी, वन्यप्राण्यांचे पाण्याच्या कमतरतेमुळे हाल होत आहेत. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे पश्चिम पुरंदरमध्ये पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे.गराडे गावानजीक दरेवाडी (ता. पुरंदर) येथे कऱ्हा नदीचे उगमस्थान आहे. कऱ्हा गराडे व कोडीत गावातून वाहत सासवड येथे येते. कऱ्हा नदीची चरणावती ही उपनदी आहे. ती भिवरी येथे उगम पावून बोपगाव, चांबळी, हिवरे गावातून वाहत येत सासवड येथील संगमेश्वर मंदिराजवळ कऱ्हा व चरणावती नदीचा संगम होतो. सासवड, खळद, बेलसर या गावातून कऱ्हेचे पाणी धावते. कऱ्हा नदीवर जेजुरीजवळ नाझरे हे मोठे धरण आहे. कऱ्हा नदीचा प्रवास पुरंदर तालुक्यातुन पुढे बारामतीकडे होतो. कऱ्हा नदीकाठावर अनेक शिवालये आहेत.गराडे विहीर, दरेवाडी, वारवडी येथील बंधाऱ्यात अजूनही पाणीसाठा टिकून असल्यामुळे गराडे पंचक्रोशीला पाणीटंचाई जाणविणार नाही, असे दिवे- गराडे गटाचे माजी जि. प. सदस्य गंगाराम जगदाळे यांनी सांगितले.कऱ्हा नदीवर गराडे येथे लघुपाटबंधारे तलाव बांधण्यात आला आहे. गराडे तलाव ६५.३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. आजअखेर गराडे तलावात २ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गराडे तलावातून सासवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे महिनाभरापासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्या सासवडकरांना वीर धरणातून पाणीपुरवठा चालू आहे. गराडे तलावातून बोपगाव व गराडे गावच्या पाणीपुरवठा योजना आहे. तसेच गराडे तलावाखालील विहिरीवर कोडीत व हिवरे गावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू आहेत. गराडे तलावातील पाणी काटकसरीने वापरल्यास मे महिन्याअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी माहिती गराडे पाटबंधारे शाखाधिकारी एम. डी. मोहिते यांनी दिली.