अवयवदाता कुटुंबियांचा हाेणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 07:38 PM2018-04-09T19:38:55+5:302018-04-09T19:38:55+5:30

रुबी हाॅल क्लिनकच्या वतीने 12 एप्रिलला अाॅर्गन डे चे अाैचित्य साधून अवयवदाता कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व पर्यंत सायंकाळी 5 वाजता अम्ब्रेला रॅलीसुद्धा काढण्यात येणार अाहे.

rubby hall will falicitate organ donar family | अवयवदाता कुटुंबियांचा हाेणार सत्कार

अवयवदाता कुटुंबियांचा हाेणार सत्कार

googlenewsNext

पुणे : 'मरावे परी अवयवरुपी उरावे'. अापल्या प्रियजनाने या जगातून निराेप घेतल्यानंतर त्याचे अस्तित्व अवयवदान करुन टिकवून ठेवणाऱ्या अवयवदाता कुटुंबियांचा सत्कार रुबी हाॅल क्लिनिक तर्फे करण्यात येणार अाहे. 12 एप्रिलला अाॅर्गन डाेनर डे चे अाैचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. त्यामध्ये या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार अाहे. तसेच अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व पर्यंत सायंकाळी 5 वाजता अम्ब्रेला रॅलीसुद्धा काढण्यात येणार अाहे. सत्काराच्या कार्यक्रमाला अभिनेते अतुल परचुरे अाणि वाहतूक उपायुक्त अशाेक माेराेळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहेत. 
        अवयवदानाबाबत जागरूकता वाढत असली तरी हवी तितकी जागृकता पाहायला मिळत नाही. भारतात अवयवदानाचा टक्का अनेक देशांपेक्षा खूप कमी अाहे. अमेरिकेत 1 दशलक्षमध्ये 26 टक्के, स्पेन मध्ये 1 दशलक्षमध्ये 36 टक्के अवयवदन केले जाते. त्या तुलनेत भारतात अवयवदानाचा टक्का 1 दशलक्षमध्ये फक्त 1 आहे. भारतातील ऑर्गन रिट्रीव्हल बॅकींग ऑर्गनायझेशनच्या अहवालाप्रमाणे प्रत्येक वर्षी गरजू रूग्णांना एक ते दीड लाख मुत्रपिंडांची गरज असते. मात्र फक्त 3500 ते 4000 चे प्रत्यारोपण होते. याचबरोबर प्रत्येक वर्षी 85 हजार ते एक लाख यकृतांची गरज असते.पण फक्त 5000 यकृतांचे प्रत्यारोपण होते. कॅडॅवर डोनेशन्सच्या बाबतीत रूबी हॉल क्लिनिकने अनेक कुटुंबियांमध्ये आशा निर्माण करत आपला ठसा उमटविला आहे.गेल्या वर्षी हॉस्पिटलच्या मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरला नॅशनल ऑर्गन अ‍ॅन्ड टिश्यु ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन तर्फे कॅडेवरीक ऑर्गन डोनेशनमध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त झाला होता.
    रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय सेवेचे संचालक डॉ.संजय पाठारे म्हणाले की,वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रगती झाली असली तरी जेथे वैद्यकीय व्यवस्थापन हा पर्याय राहत नाही अशा वेळी जीव वाचविण्याकरिता अवयव प्रत्यारोपण हा एकच पर्याय आहे .स्पेन, बेल्जियम व इतर पाश्‍चात्य देशांमध्ये याबद्दल जागरूकता असली तरी भारतात आपण अजून प्राथमिक टप्प्यात आहोत. मात्र अशा कार्यक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करून आपण बदल घडवू शकतो.

Web Title: rubby hall will falicitate organ donar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.