शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचा वाचविला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:58 IST

होळकर पुलाच्या ज्ञानेश्वर घाटाकडे एक महिला आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे खडकी पोलीस ठाण्याच्या मार्शलला आढळून आले़.

पुणे : महिला आत्महत्या करण्याच्या तयारी असलेल्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलीस हवालदार राजू मोहिते यांनी संबंधितांना त्याची माहिती घेऊन शोध घेण्यास सांगितले़. त्यानंतर काहीच मिनिटात होळकर पुलाच्या ज्ञानेश्वर घाटाकडे एक महिला आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे खडकी पोलीस ठाण्याच्या मार्शलला आढळून आले़. त्यांनी त्या महिलाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले़. ३१ जानेवारी २०१९ रोजी घडलेल्या या घटनेबद्दल क्रिएटिव्ह वूमन ग्रुपच्या प्राची दासवानी यांनी पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम व पोलीस मार्शल राजू मोहिते यांचे अभिनंदन करुन त्यांना प्रशस्तीपत्र दिले़. पोलीस नियंत्रण कक्षाला ३१ जानेवारीच्या सायंकाळी एका महिलेचा फोन आला़. त्यात तिने सांगितले की, त्यांच्या व्हाटसअप ग्रुपवर एक मेसेज आला आहे़. त्यात एक अनोळखी महिला ही औंध परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे़. ही माहिती मिळाल्यावर नियंत्रण कक्षाच्या उपनिरीक्षक सोनवणे यांनी मार्शल राजू मोहिते यांना कळविले़. मोहिते यांनी औंध परिसरातील नदीचे सर्व पुल तपासले़. पण अशी कोणतीही महिला आढळली नाही़. दुसºया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना असेल असे त्यांना वाटल्याने त्यांनी खडकी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांना वायरलेसवरुन कॉल करुन शोध घेण्यास सांगितले़. मरीआई मार्शल आबनावे व म्हस्के यांनी होळकर पुलावर पाहणी केली़ तेव्हा एक महिला ज्ञानेश्वर घाटाकडे जाताना त्यांना दिसली़. त्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त करुन खडकी पोलीस ठाण्यास घेऊन गेले़ त्या ठिकाणी तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले़ व्हीएचएफचे हवालदार धर्मराज मोहिते, मरीआई मार्शलवरील कर्मचारी नाईक आबनावे, शिपाई म्हस्के यांनी प्रसंगावधान दाखवून कर्तव्यावर दाखविलेले सतर्कतेमुळे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करुन तिचा जीव वाचविला.या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रिएटिव्ह वूमन ग्रुपच्या प्राची दासवानी, त्यांचे पती व पाच वर्षांची मुलगी मिशिका दासवानी यांनी पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांची भेट घेऊन पोलिसांचे अभिनंदन करुन त्यांना प्रशस्तीपत्रक दिले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस