शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गोयल गंगाला १९५ कोटींचा दंड; पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 04:16 IST

वडगाव येथील बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लिमिटेडला १९० कोटी रुपये अथवा प्रकल्प किमतीच्या ५ टक्के रक्कम भरण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिला आहे.

पुणे : वडगाव येथील बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लिमिटेडला १९० कोटी रुपये अथवा प्रकल्प किमतीच्या ५ टक्के रक्कम भरण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिला आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच काम केल्याने अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा दंड न्यायमूर्ती उमेश डी. साळवी आणि न्या. नगीन नंदा यांच्या पीठाने सुनावला आहे.बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी गोयल गंगा डेव्हलपर्सला एनजीटीने २७ सप्टेंबर २०१६मध्ये १०५ कोटी रुपयांचा दंड सुनावला होता. दरम्यान, पाचशे कोटींचा दंड करा, अशी मागणी करणारी पुनर्विचार याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते तानाजी बाळासाहेब गंभीरे (रा. २९६, शुक्रवार पेठ) यांनी ३१ आॅक्टोबर २०१६ला न्यायाधिकरणात दाखल केली होती.गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भारत सरकारचे पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण सचिव, स्टेट एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असिसमेंट अ‍ॅथॉरिटीचे (एसईआयएए) सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव व विभागीय अधिकारी, पुणे महापालिका, तसेच पालिकेचे शहर अभियंता, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात न्यायाधिकरणामध्ये धाव घेतली होती.याबाबत गोयल गंगा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल म्हणाले, ‘‘सर्व प्रकल्पांमध्ये वेळोवेळी मिळालेल्या परवानग्या व कायद्यांनुसार काम केले आहे . या प्रकरणातदेखील आम्ही काम सुरू करण्यापूर्वी २००८ मध्ये पर्यावरणाची परवानगी मिळविली होती आणि सुधारित परवानगीही २०१७ मध्येच मिळविली होती. साईटवर चालू असलेले काम हे पीएमसी आणि पर्यावरण विभागाकडून मिळालेल्या परवानग्यानुसार आहे. एनजीटीेने आमच्या प्रकरणाचा निर्णय घेताना बिल्टअप एरियाची व्याख्या आणि कार्बन फुट प्रिंटच्या प्रभावासारख्या विषयांचा उल्लेख केला आहे. हे मुद्दे केवळ आमच्या प्रकल्पांशी संबंधित नसून संपूर्ण देशाच्या बांधकाम प्रकल्पांवर दूरगामी परिणाम करणारे आहेत. म्हणूनच २७ सप्टेंबर, २०१६ रोजीच्या आमच्या पूर्वीच्या आदेशात उपस्थित केलेल्या बिल्ट-अपच्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ७ जुलै, २०१७ रोजी पर्यावरण व वन विभागाचा मंत्रालयाला हस्तक्षेप करावा लागला होता. ८ जानेवारी २०१९ रोजी दिलेल्या आदेशात उल्लेख केलेल्या कार्बन फुट प्रिंटच्या मुद्द्याबाबत कायदेशीर स्पष्टता आवश्यक आहे. कार्बन फुट प्रिंटच्या उल्लंघनाबाबत केवळ आम्हाला जबाबदार धरण्यात येऊ नये.पाचशे कोटींच्या दंडाची मागणीवडगाव येथील गोयल गंगाच्या बांधकाम प्रकल्पात पर्यावरण दाखल्यातील अटी आणि शर्तीचा भंग करत वाढीव बांधकाम केल्याने ही याचिका दाखल झाली होती. त्यात सांस्कृतिक सभागृहाचे बेकायदा बांधकाम पाडावे, पर्यावरण दाखला घेण्यासाठी नवीन अर्ज करण्याचे आदेश द्यावेत, पर्यावरणाची हानी केल्याने ५० हजार झाडे लावून ती ५ वर्षे जगवावीत, राखीव क्षेत्रावर बांधकाम केले असल्यास ते पाडण्यात यावे, या शिवाय पाचशे कोटींचा दंड सुनाविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.या संबंधी न्यायाधिकरणामध्ये वेळोवेळी सुनावण्या झाल्या. पर्यावरण परवानगीव्यतिरिक्त कशा पद्धतीने वाढीव काम करण्यात आले आहे, याची विविध नकाशांद्वारे माहिती देण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी (दि. ८) सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांच्या उपस्थितीत न्या. साळवी आणि न्या. नंदा यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

टॅग्स :Puneपुणे