शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यू झालेल्या शिक्षिकेच्या कुटुंबीयांना ५६ लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:47 IST

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्राथमिक शिक्षिकेच्या कुटुंबीयांना दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजाने ५५ लाख ९७ हजार ९५० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पुणे : अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्राथमिक शिक्षिकेच्या कुटुंबीयांना दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजाने ५५ लाख ९७ हजार ९५० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य आणि सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी हा आदेश दिला.आस्मा फैय्याज मोमीन असे अपघाती मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या २१ मार्च २०१५ रोजी हडपसर, ससाणेनगर येथील रस्त्याने काळेपडळकडे स्कूटीवरून चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने गणपती चौकात स्कूटीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी आस्मा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पती फैय्याज मन्सूर मोमीन (वय ३४, रा. ससाणेनगर, हडपसर) आणि तिच्या आई-वडिलांनी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अ‍ॅड. अस्लम पिरजादे, अ‍ॅड. प्रसाद शिवरकर, अ‍ॅड. सबिना रिजवान शेख यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दावा दाखल केला होता. टँकरचा चालक, मालक आणि विमा कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. आस्मा यांचे वय २८ होते. त्यांना दरमहा २८ हजार १६ रुपये पगार होता. त्यामुळे ६० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली होती. विमा कंपनीने त्यास विरोध केला. अपघाताच्या वेळी टँकर चालकाकडे माल वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम देण्यास जबाबदार नसल्याचा युक्तिवाद विमा कंपनीकडून करण्यात आला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मयताचे वय, त्यांचे त्यावेळचे उत्पन्न याचा विचार करत नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.नुकसानभरपाईच्या रकमेपैकी निम्मी रक्कम पती फैयाज मोमीन यांना, तर १६.६७ टक्के रक्कम वडील निसार अहमद कासम मुल्ला (वय ५८) यांना तसेच ३३.३३ टक्के रक्कम आई जमिला नासीर अहमद मुल्ला (वय ५२, दोघेही रा. प्रतीकनगर सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :MONEYपैसा