शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या नशिबी कोर्टाचे खेटे? साडे नऊ हजार ज्येष्ठांच्या केसेसचा भार एकाच न्यायालयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 12:38 IST

पुणे जिल्हा न्यायालयातील 32 कोर्टातून ज्येष्ठांच्या संबंधी सर्व खटले एकाच न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतक्रारदाराला किमान सहा महिन्यातून एकदाच तारीख मिळणार पुणे जिल्हा न्यायालयातील 32 कोर्टातून ज्येष्ठांच्या संबंधी सर्व खटले एकाच न्यायालयाकडे वर्ग मागील दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटल्यांच्या वर्गीकरणाचे काम सुरु

पुणे :   ‘स्पीड डिस्पोजल’ या संकल्पनेतून ज्येष्ठांना दिवाणी न्यायालयातून दाखल असलेल्या दाव्यातून तात्काळ न्याय मिळावा यासाठी चालविण्यात येणा-या विशेष न्यायालयातील भार वाढत चालला आहे. इतर कोर्टातील सर्व खटले आता एकाच कोर्टात दाखल करण्यात आल्याने ज्येष्ठांना न्याय मिळविण्याकरिता आणखी संघर्ष करावा लागणार आहे. तब्बल साडेनऊ हजार खटले एकाच न्यायालयातून चालविले जाणार असून तसे झाल्यास तक्रारदाराला किमान सहा महिन्यातून एकदाच तारीख मिळणार आहे.  उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी न्यायविभागाला आदेश पाठविला होता. त्यात स्थलांतरीत नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे खटले एका वेगळ्या न्यायालयात सुरु करावेत. त्यात त्या व्यक्तींचे खटले निकाली काढण्यात यावेत. यासंबंधीच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पुणे जिल्हा न्यायालयातील 32 कोर्टातून ज्येष्ठांच्या संबंधी सर्व खटले एकाच न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या न्यायालयावर ताण आला आहे. एकूण खटल्यांची संख्या साडेनऊ हजार असल्याने ज्या उद्देशाकरिता ज्येष्ठांसाठी स्वतंत्र न्यायालयाची निर्मिती करण्यात आली तो उद्देश सफल झाला का, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. मागील दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटल्यांच्या वर्गीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे न्यायालयातील इतर सर्व कामांचा खोळंबा झाला आहे. तक्रारदारांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत.  ‘स्पीड डिस्पोजल’च्या माध्यमातून खटला अल्पावधीत निकालात निघणार हे जरी खरे असले तरी त्याकरिता एकाच न्यायालयावर आलेल्या भारामुळे न्यायालयातील सर्वच यंत्रणेवर ताण येणार असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. पुणे बार असोशिएशने त्याबद्द्ल भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. ...................सहा न्यायालयांची गरजज्येष्ठ नागरिकांकरिता केवळ एकाच कोर्टाच्या माध्यमातून खटले निकाली काढणे शक्य नाही. त्याकरिता किमान सहा नवीन कोर्टची गरज आहे. स्पीड डिस्पोजल ही संकल्पना चांगली आहे. पण एका कोर्टातून हा प्रश्न सुटणार नाही. पुण्यात जवळपास 30 ते 35 टक्के खटले ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत. सध्या आहे त्याप्रमाणे न्यायालय सुरु असल्यास तक्रारदाराला तारखेकरिता तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. तसेच ज्या तक्रारदारांचे खटले निकालाच्या प्रक्रियेत असतील त्यांना देखील आता या नवीन न्यायालयात पुन्हा पहिल्यापासून सुनावणीला सामोरे जावे लागेल. - अ‍ॅड. सुभाष पवार (माजी अध्यक्ष-पुणे बार असोशिएशन) 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय