बिरदवडीचे माजी सरपंच बाबासाहेब पवार यांच्या श्री ग्रामदैवत रोकडोबा महाराज ग्रामवैभव व माजी सरपंच मोहन पवार यांच्या श्री ग्रामदैवत रोकडोबा महाराज ग्रामविकास या दोन पॅनेलमध्ये निवडणुकीचा सरळसरळ सामना झाला.पॅनलप्रमुख असलेले दोन्ही माजी सरपंच पवार निवडून आले. निवडणुकीतील मातब्बर उमेदवार यांनी उडविलेला प्रचाराचा धुराळा मतदारांच्या लक्षात राहणारा ठरणार आहे.आमची सत्ता येणार असे दावे दोन्ही पॅनलेकडून केले जात होते.परंतु निकालाअंती माजी सरपंच बाबासाहेब पवार यांच्या पॅनेलने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.तर माजी सरपंच मोहन पवार बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत ही सत्यस्थिती आहे.
श्री ग्रामदैवत रोकडोबा महाराज ग्रामदैवत पॅनेलचे बाबासाहेब रामचंद्र पवार,स्नेहा विशाल पवार, लक्ष्मीबाई भिकाजी पवार,कल्पना मोहन पवार,मंगल एकनाथ पवार,काळुराम किसन जाधव हे विजयी झाले.तर श्री ग्रामदैवत रोकडोबामहाराज ग्रामविकास पॅनेलचे मोहन बंडू पवार,दत्तात्रय राजाराम गोतारणे व अनिता जितेंद्र फडके तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
२७ आंबेठाण
बिरदवडी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार.