शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार यांची सामाजिक बांधिलकी; कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या १६ जिल्ह्यात सॅनिटायझर वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:13 IST

वर्क फ्रॉम होम ची पध्दत अवलंबत राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलिस आयुक्तालये यांच्याशी संपर्क

ठळक मुद्देअहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूरसह १६ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश

बारामती : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून घरून राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलिस आयुक्तालये यांच्याशी संपर्क साधत आहे. आता त्यांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत सामाजिक बांधिलकी जपत या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात तब्बल २० हजार लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये राज्यातील मुंबई,पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूरसह १६ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. ससून, नायडू रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरातही याचे वितरण करण्यात आले आहे. रोहित पवार यांनी जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतानाच सॅनिटायझरचा व मास्कचा तुटवडा असल्याची माहिती लक्षात घेऊन त्यांनी घरातूनच राज्यभरातील युवकांशी संपर्क व संवाद साधत उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या वर्क फ्रॉम होम ची पध्दत आदर्श घ्यावा,अशीच आहे.आमदार पवार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या मदतीने राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधे २० हजार लिटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील पोलिस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग यंत्रणेतील अधिकारी,कर्मचारी, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच  त्या भागातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे,आरोग्य उपकेंद्रे यांच्या वापरासाठी हे सॅनिटायझर पाठवण्यात येत आहे.--------...ससून व नायडूला ही मदतयाखेरीज पुण्यात ससून व नायडू संसर्गजन्य विकार उपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधक चष्मेही वितरीत करण्यात आले आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीRohit Pawarरोहित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल