शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...यासाठी रोहित पवार यांना हवा कर्जत मतदारसंघ : विधानसभेसाठी पक्षाकडे मागितली उमेदवारी 

By पूनम अपराज | Updated: July 3, 2019 12:14 IST

रोहित पवार हडपसर आणि कर्जत-जामखेड अशा दोनही मतदारसंघांमध्ये कन्फ्युज असल्याची चर्चा होती. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला असून पक्षाकडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कर्जत मतदारसंघाकरिताच्या उमेदवारीची मागणी केली आहे. पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून 'कर्जत-जामखेड का' अशी पोस्ट लिहून त्याबद्दलचे विचार मांडले आहेत. 

पुणे : गेले काही दिवसांपासून शरद पवार यांचे नातू रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर खुद्द रोहित पवार यांनीही त्याला दुजोरा दिला होता. मात्र ते हडपसर आणि कर्जत-जामखेड अशा दोनही मतदारसंघांमध्ये कन्फ्युज असल्याची चर्चा होती. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला असून पक्षाकडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कर्जत मतदारसंघाकरिताच्या उमेदवारीची मागणी केली आहे. पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून 'कर्जत-जामखेड का' अशी पोस्ट लिहून त्याबद्दलचे विचार मांडले आहेत. 

           पवार सुमारे दोन वर्षांपासूनअहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये पक्षाचे आणि वैयक्तीक उपक्रम राबवत आहेत. मात्र इथेच लढणार असल्याची माहिती त्यांनी कधीही स्पष्टपणे दिली नव्हती. दुसरीकडे पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्येही त्यांनी चाचपणी केली होती. पण अखेर त्यांनी सर्व बाबतीत सुरक्षित असलेल्या कर्जतची निवड केली आहे.  इथे त्यांचा सामना भाजपचे मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. 

        यासंदर्भात फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, 'कर्जत जामखेड का याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकिय क्षेत्र ज्या प्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे तसाच विश्वास ते टाकतील किंबहूना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकिय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो'. आता त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेते काय प्रतिसाद देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKarjatकर्जतvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार