शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

पुणे शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटलांचे महापालिका आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 09:13 IST

शहरातील ९० टक्क्यांहून अधिक खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा

पुणे : शहरातील ९० टक्क्यांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, शहरातील वास्तव वेगळेच आहे. कोथरूडमधील रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाल्याने ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी कोथरूडचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.पाटील यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचल्याचेही दिसून येत आहे.

पावसाने प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे, कर्वे रस्ता, आशिष गार्डन परिसर, गुजरात कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक-कॅनॉल रोड), पौड फाटा, सदानंद हॉटेलसमोरील बाजू, एनडीए चौक, लोहिया जैन आयटी पार्क, कोथरूड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता, पौड रोड, आनंदनगरसमोरील बाजू यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत. याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्यालगतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत, याकडे पाटील यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तroad safetyरस्ते सुरक्षा