शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वर्दळीचा रस्ता गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:39 IST

प्रवासासाठी धोकादायक बनला रस्ता

दावडी : खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा मार्ग असलेला खरपुडी ते शिरोली फाटा हा रस्ता सातत्याने दुर्लक्षीत व डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत राहिला आहे. परिणामी या मार्गावर अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यातील सर्व खड्डे पाण्याने भरुन त्यांना तळ्याचे स्वरुप आल्याने हा मार्ग अधिकच धोकादायक व जीवघेणा बनला आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.पावसाच्या सुरुवातीला खड्यामुळे रस्ता हा पाण्यात हरविल्याची परिस्थिती दिसून आल्याने मुसळधार पावसात काय होईल? या विचारात ग्रामस्थ, वाहन चालकांंमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. रस्त्यात जागोजागी पाणी साचल्याने मोठ्या वाहनांनी उडणारे पाण्याचे फवारे पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या रस्त्याच्या भयाण दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजुने गटारे नसल्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रवासी, देवाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना, ग्रामस्थ व वाहनचालकांना या जीवघेण्या मार्गावरुन जीवनमरणाशी संघर्ष करीतच काढावा लागत आहे.प्रवासासाठी धोकादायक बनला रस्ताहा रस्ता प्रवास करण्यासाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थाकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.अशा खड्डेमय मार्गांमुळे खरपुडी ते शिरोली फाटा हा केवळ पंधरा मिनिटाचा प्रवास अर्धा तासावर गेला आहे. तसेच खरपुडी गावात प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध असे खंडोबा मंदिर आहे. येथे नेहमी भाविकांची गर्दी असते. या रस्त्याच्या अश्या दुरवस्थेमुळे येणाºया नागरिकांचे हाल होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेPuneपुणे