शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

न-हेगावचे रस्ते लागले मृत्युपंथाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:25 IST

ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. बऱ्याच नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी सिमेंटचा रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्या;

कल्याणराव आवताडे न-हे : येथील ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. बऱ्याच नागरिकांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी सिमेंटचा रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्या; परंतु तो रस्ता पूर्ववत न करता तसाच ठेवल्याने वाहनचालकांना मात्र कसरत करत गाडी चालवावी लागत आहे; शिवाय बऱ्याच वाहनचालकांना; तसेच विद्यार्थ्यांना यामुळे मानदुखी व पाठदुखीसारखे आजारही सुरू झाले आहे; मात्र यावर स्वत:ला नेते म्हणवून घेणारे व प्रशासकीय अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.नºहेगाव हे पुणेशहरालगत असल्याने बºयाच नागरिकांनी या परिसरात फ्लॅट विकत घेतले. येथील लोकसंख्याही जवळपास दीड लाखाच्या आसपास आहे. वाढणाºया लोकसंख्येला लक्षात घेता ग्रामपंचायत मात्र मूलभूत सोयी-सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. परिसरात होणारी वाहतूककोंडी ही नागरिकांना भेडसावत असलेली सर्वांत मोठी समस्या आहे. त्यातच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी ही जास्तच वाढत असून, याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेष म्हणजे, शाळांतील मुलांना पाठदुखी व तत्सम त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे.नºहे हे शैक्षणिक केंद्र बनले असून, येथे सध्या पाचहून अधिक कॉलेज आणि १८ हून अधिक लहान -मोठ्या शाळा आहेत. या शाळा, कॉलेजांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थी बस अथवा खासगी वाहनाने प्रवास करतात; परंतु खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे या विद्यार्थ्यां$$ना तासन्तास पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन प्रवास करावा लागतो. एकीकडे अभ्यासाचा वाढता ताण आणि दुसरीकडे दप्तराचे ओझे; तसेच प्रवासासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने विद्यार्थ्या$ंना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.मानाजीनगर येथील रस्त्यालगत रस्त्यांच्या बाजूलाच राडारोडा टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.श्री कंट्रोल चौकातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरची खडी उखडल्याने रस्त्यावर नेहमी धुळीचे साम्राज्य असते. या अडचणींमुळे मोटारसायकलस्वारांना मोठा त्रास होत आहे. रस्त्यांची खडी पूर्णपणे उखडलेली असल्याने रस्त्यावर मातीच पसरलेली आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो.>राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची उदासीनतायेथील सेल्फी पॉइंटजवळील सेवा रस्ता एका कंपनीने अर्धा खोदला असून, तो तशाच अवस्थेत अनेक महिन्यांपासून आहे. राष्ट्रीय प्रशासन मात्र याकडे सपशेल डोळेझाक करीत आहे; तसेच भूमकर चौकातील पुलाजवळील महामार्ग व सेवा रस्त्याच्या मध्ये बांधण्यात येणाºया भिंतीचे काम मागील बºयाच दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असून, येथील महामार्ग रस्ता खचल्यास मोठ्या अपघाताचा धोका संभवतो. जनतेकडून रोड टॅक्स, टोल घेतला जातो, नोकरदार आयकर भरतात, त्याबदल्यात चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ? तसेच रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांकडून दंड घेण्याची काय तरतूद आहे? खड्ड्यांमुळे अपघात होतात, लोक जखमी होतात आणि कधी कधी जीव गमावतात, त्याला जबाबदार कोण? अशाप्रकारचे प्रश्न येथील नागरिक विचारताना दिसून येत आहेत.>सेवारस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे ‘लोकमत प्रतिनिधी’ने संपर्क साधला असता, तेथील अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचबरोबर अपूर्ण कामांचे फोटो द्या, काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही तेथील अधिकाºयांनी सांगितले.>दप्तराचे वजन जास्त असल्यास मणके, स्नायूंची झीज होणे, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे आजार होऊ शकतात. सध्या खराब झालेले रस्ते, वाहतूककोंडी यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांच्याही आरोग्याबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.- डॉ. निखिल भाकरे, संचालक भाकरे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल>खोदले गेलेले रस्ते, प्रशासनाने तांत्रिक पद्धतीने बुजवावेत; अन्यथा आम्हा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.- नरेंद्र जायले, नागरिक