शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

समाविष्ट गावांतील रस्ते पालिकेच्या नकाशावर; कोट्यवधी रुपये उभे करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 05:07 IST

न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने महापालिका हद्दीत समावेश केलेल्या ११ गावांमधील प्रमुख रस्त्यांच्या पाहणीस महापालिकेने सुरुवात केली आहे. सर्व गावांमध्ये मिळून साधारण १५० किलोमीटर अंतराचे रस्ते असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने महापालिका हद्दीत समावेश केलेल्या ११ गावांमधील प्रमुख रस्त्यांच्या पाहणीस महापालिकेने सुरुवात केली आहे. सर्व गावांमध्ये मिळून साधारण १५० किलोमीटर अंतराचे रस्ते असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. सध्याची अवस्था लक्षात घेतली असता या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये लागणार असून, ते उभे करायचे कसे, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे.महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यांची पाहणी सुरू केली आहे. विसर्जित ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले होते किंवा कसे याची माहिती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याविषयी विचारणा करण्यात येत आहे. त्यात या रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे दिसते आहे. बहुसंख्य रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. त्याची साधी दुरुस्ती करायची तरी काही कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेकडे तर त्यासाठी काहीही निधी नाही. राज्य सरकारनेही हात वर केले आहेत. महापालिका प्रशासनाच्या नगरसेवकांच्या निधीमधून काही रक्कम घ्यावी हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला आहे. त्यामुळे निधी आणायचा कुठून, या पेचात प्रशासन सापडले आहे.धायरी, शिवणे, उत्तमनगर, उंड्री, देवाची उरुळी, फुरसुंगी, लोहगाव, केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, साडेसतरा नळी या गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे सर्व ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या असून, त्यांचे दप्तरही महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांच्या शिल्लक निधीबाबत सरकारने काहीच आदेश दिलेले नाहीत.सर्व ग्रामपंचायतींकडे मिळून एकूण ५० कोटी रुपये शिल्लक असल्याची महापालिका प्रशासनाची माहिती आहे. त्यामुळेच हा निधी महापालिकेत वर्ग करून घेऊन त्यातून किमान या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम तरी सुरू करावे असे काही अधिकाºयांचे मत आहे. मात्र त्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. प्रशासनाने निधीसाठी सरकारला पत्र दिले आहे तर त्याची अजून दखलच घेण्यात आलेली नाही.सर्वच गावांमधील नागरिक खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. धायरी, शिवणे, उत्तमनगर, उंड्री, देवाची उरुळी, फुरसुंगी, लोहगाव, केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, साडेसतरा नळी ही ११ गावे महापालिकेत आली आहेत. ही सर्वच गावे महापालिकेच्या भोवतालची असून, आता तर महापालिकेतच आली आहेत. तिथे मोठमोठ्या सोसायट्यांची बांधकामे झाली, मात्र रस्त्यांसारख्या सुविधांची वानवा आहे. त्यामुळेच आता हा सर्व भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. महापालिकेतील समावेशामुळे तेथील नागरिकांच्या अपेक्षावाढल्या आहेत.सुरुवातीच्या बैठकीतच माजी लोकप्रतिनिधींनी आम्हाला स्वतंत्र निधीची तरतूद करून द्या अशी आग्रही मागणी केली होती. मात्र त्याबाबतीत महापालिका प्रशासन किंवा पदाधिकारी काही हालचालच करायला तयार नाहीत.कर्मचारी पालिकेत : वेतनच नाहीया ११ गावांमधील ग्रामपंचायतींचे सुमारे ५३५ कर्मचारीही महापालिकेत वर्ग झाले आहेत, त्यांना गेले ३ महिने वेतनच मिळालेले नाही. त्यांना किती वेतन द्यायचे, सेवाज्येष्ठता कशी नोंद करून घ्यायची, पदे कोणती द्यायची याबाबतही सरकारने काहीही मार्गदर्शन केलेले नाही.रस्त्यांची माहिती घेत आहोतरस्त्यांची आम्ही नोंदणी करून घेत आहोत. महापालिकेने कामे सुरू करण्याआधी या रस्त्यांची कामे करण्याबाबत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत यांनी काही कार्यारंभ आदेश वगैरे दिले आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे. निधीचा प्रश्न लवकरच सुटेल. सरकारकडे प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे. पदाधिकारी व वरिष्ठ स्तरावर यासाठी प्रयत्न सुरू आहे.- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, पथ विभागनिधीची जबाबदारी महापालिकेचीनिधीची समस्या सोडवण्याचे काम महापालिका प्रशासनाचे आहे. त्यांनी सरकारकडे मागणी करायला हवी. त्यासाठी राजकीय दबाव टाकायला हवा. महापालिकेचे अंदाजपत्रक ५ हजार ६०० कोटी रुपयांचे आहे. आता या सर्व गावांमधूनही महापालिकेला महसूल मिळेल. आम्हाला रस्ते चांगले हवेत व सुविधाही चांगल्या हव्यात- श्रीरंग चव्हाण,अध्यक्ष, हवेली तालुका कृती समिती

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका