शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

घाट नव्हे खड्ड्यांचा रस्ता...!; दोन महिने सिंहगड रस्ता बंद ठेऊनही अपेक्षित काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:06 IST

पुण्याचे वैभव व देश-विदेशातील पर्याटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगड घाट रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एक ते दीड किलो मिटरचा रस्ता सोडल्यास बहुतेक संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, डांबर निघून गेल्याने रस्ता निसरडा झाला आहे.

ठळक मुद्देजून महिन्यात दरड कोसळलेल्या भागातील तुडलेला कठडादेखील अद्याप दुरुस्त नाहीदुचाकी अथवा मोठी वाहने घेऊन जाणे ठरत आहे धोक्याचे

पुणे : पुण्याचे वैभव व देश-विदेशातील पर्याटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगड घाट रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या पुणेकरांसह राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहलीसाठी सिंहगडावर येत आहेत. परंतु एक ते दीड किलो मिटरचा रस्ता सोडल्यास बहुतेक संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, डांबर निघून गेल्याने रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे सिंहगडावर दररोज जाणारे शेकडो पर्यटक जीव मुठीत घेऊनच प्रवास करत असल्याचे लोकमत पाहणीमध्ये निदर्शनास आले.जून महिन्या सिंहगड घाट रस्त्यांवर मोठी दरड कोसळल्याने शेकडो पर्यटक गडावर अडकून पडले होते. या रस्त्यांवरील बहुतेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नंतर तब्बल दोन महिने सिंहगड घाट रस्ता पर्याटकांसाठी बंद ठेवण्यात आला. या दरम्यान शासनाने दीड कोटी रुपयांची तरतुद करून दरड प्रतिबंधक भागात सुरक्षा जाळ्या बसविण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही भागात दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्यात आल्या असून, काही ठिकाणी जाळ्या लावून दगडाचे सुरक्षा कठडे करण्यात आले आहे. परंतु दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल दोन महिने सिंहगड रस्ता बंद ठेऊन देखील अपेक्षित काम मात्र करण्यात आलेले नाही. जून महिन्यात दरड कोसळलेल्या भागातील तुडलेला दुरक्षा कठडादेखील अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

सुट्टी आणि सिंहगड हे जणू समीकरणच बनले आहे. त्यात पावसाळा आणि थंडीच्या हंगामात गडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यात आता २६ जानेवारी (शुक्रवार) ते रविवार सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक बोच-या थंडीचा अनुभव घेण्यासाठी गडावर जातात. परंतु सध्या गडावर जाण्या-या रस्त्यांची स्थिती पाहिल्यास हा प्रवास पर्यटकांसाठी खडतर आणि जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे. पावसामुळे बहुतेक ठिकाणचा डांबरी रस्ता वाहून गेला आहे. तर काही ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडले आहे. यामुळे दुचाकी अथवा मोठी वाहने घेऊन जाणे खरेच मोठे धोक्याचे ठरत आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालून सिंहगड रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मत पर्यटकांंनी लोकमतची बोलतांना व्यक्ते केले.

पुन्हा ऐन हंगामात सिंहगड रस्ता राहणार बंदजून महिन्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने तब्बल दोन महिने दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षा कठडे व जाळ्या बसविण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. आता रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पाच कोटींचा निधी दिला असून, निविदा, वर्क आॅर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार आहे.- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण)

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणे