शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या रस्त्याला पालिकेचा अाधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 21:26 IST

संचेती चाैकातील रस्ता बुधवारी दुपारी अचानक खचला. सुदैवाने त्यावेळी तेथे कुठलेही वाहन नसल्याने कुठलाही अपघात झाला नाही. पालिकेने याची तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला.

पुणे : गर्दीच्या शिवाजीनगर भागातील संचेती चाैकातील रस्ता दुपारच्या सुमारास अचानक खचला. सुदैवाने रस्ता खचला त्यावेळी कुठलेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने माेठा अनर्थ टळला. महापालिकेने या घटनेची तात्काळ दखल घेत रस्ता दुरुस्त केला. या रस्ताच्या खालील जलवाहीनीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात अाले हाेते. त्यानंतर एका कंत्राटदाराकडून महापालिकेने हा रस्ता पूर्ववत करुन घेतला. परंतु कंत्राटदाराने याेग्यरितीने हा रस्ता पूर्ववत न केल्याने ताे बुधावारी खचला, त्यामुळे ज्या कंत्राटदाराने नंतर हा रस्ता तयार केला त्याच्यावर महापालिका कारवाई करणार का ?,असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे. 

    पुण्यातील संतेची चाैक हा वर्दळीचा भाग अाहे. पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर, अाैंध या शहराच्या महत्त्वाच्या भागांमधून माेठ्याप्रमाणावर वाहने जंगली महाराज रस्त्याकडे जाण्यासाठी या चाैकात येत असतात. दरराेज माेठी वाहतूक या भागातून हाेत असते. बुधवारी शिवाजीनगरकडून संचेती चाैकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या चाैकातील काही भाग अचानक खचला. सुदैवाने यावेळी या ठिकाणी कुठलेही वाहन नसल्याने कुठलिही  दुर्घटना घडली नाही. पाेलीसांनी वेळीच बॅरिगेट लावून वाहनचालकांना सुचित केले. त्यानंतर काही वेळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता दुरुस्त केला. काही दिवसांपूर्वी या रस्ताच्या खालून पाण्याची गळती हाेत असल्याने हा रस्ता खाेदण्यात अाला हाेता. पाण्याच्या लाईनची दुरुस्ती केल्यानंतर पालिकेने एका कंत्राटदाराकडून हा रस्ता पूर्ववत करुन घेतला परंतु कंत्राटदाराने याेग्यरित्या हा रस्ता तयार न केल्यामुळे हा रस्ता खचला. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर पालिका कारवाई करणार का ?असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाnewsबातम्या