शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतुकीने रस्ता खचला

By admin | Updated: July 8, 2017 01:59 IST

सासवड-कापूरव्होळ मार्गावरील नारायणपूर-चिव्हेवाडी घाटरस्ता ते बालाजी मंदिर (केतकावळे)दरम्यान रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासवड-कापूरव्होळ मार्गावरील नारायणपूर-चिव्हेवाडी घाटरस्ता ते बालाजी मंदिर (केतकावळे)दरम्यान रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. तसेच ,साईडपट्ट्याही वाहून गेल्याने घाटरस्त्याला तीव्र उतार निर्माण झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून वारंवार अपघात होत आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारच नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी खड्डे पडतात. रस्ता जागोजागी उखडत आहे. या मार्गावरून टोल चुकविण्यासाठी जड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या जड वाहतुकीमुळे रस्ता खचण्याचे तसेच खड्डे पडण्याचे प्रकार घडत आहेत.घाटरस्ता हा बहुतांशी अरुंद आहे. झाडेझुडपे वाढल्याने वळणाचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहने अपघाताला बळी पडत आहे. पावसाळ्याच्या हंगामासह वर्षभर. किल्ले पुरंदर, नारायणपूर, बालाजी मंदिर परिसरात पर्यटकांची गर्दी असते. काही उत्साही पर्यटक सेल्फी काढण्यासाठी ऐन घाटात, धबधबा पाहून वाहने रस्त्यातच उभी करतात. यामुळे इतर पर्यटकांना विनाकारण त्रास सोसावा लागतो. देवडी फाट्यावरून पुढे गेले, की लगेचच उतारावरील रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. येथे वाहनांना नक्की कोणत्या मार्गाने जावे, असा प्रश्न पडतो.या वळणावळणाच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाममात्र आहेत. तसेच, दिशादर्शक फलक उखडलेले आहेत. भंगार गोळा करणाऱ्यांचे ते लक्ष्य ठरतात. रस्त्याला रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीचा प्रवास करताना रस्त्याच्या रुंदीचा अंदाज येत नाही व दुचाकीचालक नाल्यात घसरून पडतात.पुरंदर सार्वजनिक बांधकाम स्थानिकस्तर विभाग हा फक्त नावालाच आहे. शाखा अभियंता व उपअभियंता हे असून नसल्यासारखेच आहेत. कार्यालयीन वेळेत ते उपलब्ध नसतात. भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता संपर्क क्षेत्राच्या कायम बाहेर असतात.न्हावीसांडस रस्त्याची दुरवस्थातळेगाव ढमढेरे : न्हावी सांडस - तळेगाव ढमढेरे रस्त्याची एक किलोमीटरपर्यंत मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. तळेगाव ढमढेरे - न्हावी सांडस रस्ता विठ्ठलवाडी जोड रस्त्यापर्यंत साधारण चार किलोमीटरचा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्यात तळेगाव ढमढेरेपासून, तसेच विठ्ठलवाडी रस्त्यापासून तीन किलोमीटरपर्यंत भक्कम स्वरूपाचे डांबरीकरण झालेले आहे. परंतु मधल्या एक किलोमीटरच्या रस्त्याची मात्र अतिशय दयनीय अवस्था झाल्याने विशेषत: या रस्त्याने ये-जा करणारे शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, कामगार व शालेय विद्यार्थी यांचे सध्याच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचते, चिखलमय रस्ता होत असल्याने दुचाकी गाड्या घसरतात. यामुळे नागरिकांचे या रस्त्याने ये-जा करीत असताना हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या जैसे थे आहे. नागरिक व ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे सतत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहे.या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीमधून या एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. टेंडर पास झाल्याबरोबर या रस्त्याचे भक्कम स्वरूपात डांबरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम झाल्यानंतर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. - गोविंद ढमढेरे, सदस्य-ग्रामपंचायत, तळेगाव ढमढेरे