पुणे : एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने रविवारपर्यंत (दि. ३०) तरंग हे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कलाकारांच्या भावरेषा पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे. राजा रविवर्मा कलादालनात सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन खुले राहील. प्रशालेच्या सिब्लिंग स्टेप्स या संघाच्या, स्वानंदी सरदेसाई, तृप्ती चिपळुणकर, दुर्गा शहाणे, प्रणिता पाटील, भाग्यश्री येवले, सिमरन राठोड, शुभेच्छा देशपांडे, तृप्ती जोशी यांनी हे प्रदर्शन भरविले आहे. शुक्रवारी शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते उद््घाटन झाले. श्निवारी दुपारी ४ वाजता अझरुद्दीन इनामदार प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
रविवर्मा गॅलरीत चित्रतरंग
By admin | Updated: April 29, 2017 04:30 IST