शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोड बाधितांना लगतच ५० टक्के जागा - किरण गित्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:33 IST

पूर्ण रिंग रोड करण्यासाठी १० हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. रिंग रोडलगत ५०० - ५०० मीटरमध्ये टाऊनशिप होणार आहे. त्यामध्ये रिंग रोड बाधित शेतकरी हा भागीदार असेल.

मांजरी : पूर्ण रिंग रोड करण्यासाठी १० हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. रिंग रोडलगत ५०० - ५०० मीटरमध्ये टाऊनशिप होणार आहे. त्यामध्ये रिंग रोड बाधित शेतकरी हा भागीदार असेल. शेतीझोन असलेला भाग ५०० मीटरपर्यंत रहिवासी झोन होणार आहे. तसेच, ज्या शेतकºयांची जागा रस्त्यात जाणार आहे, अशा शेतकºयांना गेलेल्या जागेपैकी १ किलोमीटर परिसरात ५० टक्के जागा देण्यात येईल, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे येथील आयुक्त किरण गित्ते यांनी येथे सांगितले.रिंग रोडमध्ये ज्या शेतक-यांच्या शेतजमीन जात आहे, अशा शेतकºयांसोबत चर्चा करण्यासाठी प्राथमिक बैठक आज मांजरी खुर्द येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पार पडली. या वेळी किरण गित्ते, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, कार्यकारी अभियंता एस. बी. देवडे, मगरपट्टा सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष सतीश मगर, तसेच मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, कोलवडी, आव्हाळवाडी परिसरातील रिंग रोड बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्या शेतकºयांची जागा रस्त्यालगत जाणार आहे, अशा शेतकºयांना जागा रस्त्यालगतच मिळणार, ज्यांची आतमध्ये जागा आहे त्यांना आतील बाजूस जागा मिळणार त्यासाठी आडवे-उभे रोड पाडण्यात येणार आहे. शेवटच्या जागेपर्यंतचा रस्ता १२ मीटरचा असेल यामुळे कुठलाही शेतकरी भूमिहीन होणार नाही. तसेच जागेबरोबरच २.५ एफएसआय फ्री देण्यात येणार आहे. म्हाळुंगे आणि माण या भागात स्किम राबवली आहे त्याला तीन महिने लागले. टाऊनप्लॅनिंगमध्ये रस्ते, वीज, ड्रेनेज, अग्निशमन दल, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, पिण्याचे पाणी, कचराविल्हेवाट या सोयी सुविधा पुरविण्यात येतील. मात्र ज्यांना टाऊनप्लॅनिंगमध्ये सामील व्हायचे नाही, अशा शेतकºयांना या सोयी उपलब्ध पुरवल्या जाणार नाहीत, त्यांन टिडीआर मिळेल असे या वेळी बैठकीत सांगण्यात आले. लगतच्या शेतकºयांना देता येणारा रिंग रोड आणि टाऊनशिप ही दोन्ही कामे ऐकावेळी करण्यात येणार आहे.शेतकºयांनी सहकार्य केल्यास लवकर सुरुवात होईल आणि विरोध केल्यास टाऊनशिप वगळून रस्ता करण्यात येईल. तसेच, हा रस्ता करण्यासाठी तीन वर्षे लागणार आहे. शेतकºयांनी सध्या जमिनी विकू नयेत, शासनासोबत करार करावा, असे गित्ते यांनी सांगितले.रिंग रोडमुळे मांजरी खुर्द व जवळपासचा परिसराचा चेहरामोहरा बदणार असल्याचे चित्र दिसत आहे, तर बांधकाम व्यावसायिक सतीश मगर म्हणाले की, सध्या केशवनगर मुंढवा, व नगररोडकडे वाघोली सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. रिंग रोड झाल्यास ती होणार नाही आणि मुंबईकडे जाताना बाणेर-बालेवाडी, वाकड हा भाग पाहता आपल्याकडेही अशाच पद्धतीचे स्वरूप येऊ शकते, असे मला डोळ्यासमोर दिसते. त्यामुळे शेतकºयांना संधी आली आहे,ती गमावू नका, हेच माझे म्हणणे आहे.रिंग रोडबाबत कशा पद्धतीचा मोबदला मिळणार हे सांगितल्यानंतर काही शेतकºयांनी टाऊन प्लॅनिंगला पसंती दर्शवली तर काही शेतकºयांनी ११० मीटर रस्ता करण्यासाठी विरोध दर्शविला. टाऊनशिप प्रकल्पाला अनेक लोकांनी पसंती दिली. परंतु, एफएसआय, टीडीआरवाढवून देण्यात यावा, अशी मागणी केली.रिंग रोडचे सहा भागशहराबाहेरून जाणारा रिंग रोड १२९ किलोमीटरचा परिघ आकाराचा आहे. त्यात सहा भाग करण्यात आले आहे. तर रिंग रोडची रुंदी ११० किलोमीटर असणार आहे. राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्याकडून ६५० कोटी, तर केंद्र शासन यांच्याकडून १५०० कोटी रुपये पहिला हप्ता, असा २१५० कोटींच्या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात मदत होणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले.गित्ते म्हणाले की, २०१५ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुण्याची स्थापना झाली. १७ मार्च २०१७ ला शासनाकडून रिंग रोडला मंजुरी मिळाली. त्यामुळे मंजूर झालेल्या रिंग रोडमध्ये बदल होणार नाही. मांजरी खुर्द येथील मुळा-मुठा नदीवर ११० मीटर रुंदीचा पूल करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पाहण्यासारखा हा रिंग रोड असेल. चार पदरी रिंग रोडचे दोन भाग, असे आठपदरी रोड होणार आहे. लगत बाजूला सर्व्हिसरोड असणार आहे. मध्यभागी मेट्रोसाठी जागा सोडली आहे. ४२ रस्ते रिंग रोड जवळून जाण्या-येण्यासाठी काढले आहेत.

टॅग्स :Puneपुणे