शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भुलेश्वर घाटात अवकाळी पावसामुळे कोसळली दरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:06 IST

भुलेश्वर घाटाच्यावर असणाऱ्या माळशिरस, टेकवडी, पोंढे यांना यवत या गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनी केला रस्ता साफ : कोणतीही जीवितहानी नाही 

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाऱ्या भुलेश्वर घाटात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे दरड कोसळून वाहतुकीला अडथळा आला. मात्र, या रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांनी रस्त्यावरील दगड-गोटे बाजूला करून रस्ता मोकळा केला. यामुळे वाहतूककोंडी झाली नाही. रात्रीची दरड कोसळल्याने कोणतीही हानी झाली नाही. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याकडे सासवड-यवत रस्त्याबरोबरच भुलेश्वर घाटाचीही दुरुस्ती करण्याची मागणी केली. या नागरिकांची मागणीची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून ५ कोटी ४० लाखाचा निधीही मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. यात भुलेश्वर घाटाचेही रुंदीकरण करण्यात आले. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर सरळ तोडण्यात आला. यामुळे उन्हात डोंगर गरम होऊन पावसाळ्यात भिजल्याने ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या चारीमध्ये डोंगराची दगड माती पडल्याने चारी बुजल्या आहेत. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. घाटाचे रुंदीकरण झाले, मात्र पुलांची कामे करण्यात आली नाहीत. नवीन पुलांचे पाइपही घाटात टाकले गेले. मात्र, आज त्या ठिकाणी पाईप दिसत नाहीत, मग हे पाईप नक्की गेले तरी कुठे? रस्ता दुरुस्त करण्याअगोदर अरुंद पुलांची कामे व्हायला हवी होती, मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. यामुळे आजही येथील अरुंद पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके म्हणाले, श्री क्षेत्र भुलेश्वर घाटातील मोठमोठे दगड पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेकदा दगड हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे मोठी यात्रा भरते. 

..........यवतकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग भुलेश्वर घाटाच्या वर असणाऱ्या माळशिरस, टेकवडी, पोंढे यांना यवत या गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. घाटाच्या वरील बाजूला असणारे भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी शिल्पकला अभ्यासक, पर्यटक, भक्त या ठिकाणी  येत असतात. पुण्यापासून ७० किमीवर भुलेश्वर मंदिर आहे. यामुळे बहुतांशी भाविक भुलेश्वरी येण्यासाठी याच घाटाचा वापर करतात. .............

टॅग्स :Puneपुणे