शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा मुलगा लष्करी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 05:03 IST

घरची परिस्थिती बेताचीच. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी रिक्षा चालवून वडिलांनी शिकविले.

पुणे : घरची परिस्थिती बेताचीच. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी रिक्षा चालवून वडिलांनी शिकविले. त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्याने लष्करात येण्याचा मार्ग निवडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही. कुठलेही पाठबळ नसताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पहिल्या चार यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान मिळवले. सार्थक ढवण असे त्याचे नाव. तो मूळचा कोल्हापूरचा आहे.वडील रिक्षा चालवायचे. आम्हाला शिकवताना त्यांची ओढाताण व्हायची. मात्र ते डगमगले नाहीत. त्यांना मानाने जगता यावे यासाठी लष्कराचा मार्ग निवडला, असे सार्थक म्हणाला. वडिलांचे अनेक मित्र लष्करात होते. यामुळे त्यांच्यापासून लष्करात दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. आई आज असती तर माझ्या यशाने तिला मोठा आनंद झाला असता. या प्रवासात माझ्या भावाने मला पाठिंबा दिला. आर्मी कॅडेट असल्यामुळे राष्ट्रीय रक्षा अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे सार्थक याने सांगितले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी १३६ व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ बुधवारी झाला. प्रबोधिनीतील विविध शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य निवृत्त एअर मार्शल अजित भोसले यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. एनडीएचे प्रमुख एअरमार्शल आय.पी. विपीन, उपप्रमुख अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रा. ओमप्रकाश शुक्ला उपस्थित होते.>‘एनडीए’त महाराष्ट्र नाहीदेशासाठी लष्करी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात आहे. मात्र, राज्यातील विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मराठी मुलांनी या मानाच्या संस्थेत मोठ्या प्रमाणावर भरती व्हावे. - सार्थक ढवण