शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी महिलेची बॅग जबरदस्तीने हिसकाविणारा रिक्षाचालक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 21:35 IST

कोंढवा येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या महिलेने २१ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गोकुळनगर येथून रिक्षा केली होती.

पुणे : अव्वाच्या सव्वा रिक्षा भाडे सांगून महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेणार्‍या रिक्षाचालकाला तब्बल एक महिन्यानंतर पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट १ ला यश आले आहे.

राहुल प्रकाश भोडणे (वय २९, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे़  कोंढवा येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या महिलेने २१ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गोकुळनगर येथून रिक्षा केली होती. साधारण या अंतराचे ५० रुपये भाडे होत असतानाही राहुल भोडणे याने २०० रुपये भाडे मागितले. त्यावरुन वाद झाल्याने भोडणे याने या महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली होती. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यातील रिक्षाचालकाचा शोध घेतला जात होता. पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना हा रिक्षाचालक पहिले भाड्याचे घर सोडून टिळेकरनगर येथे दुसर्‍या भाड्याच्या घरात रहायला गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करुन भोडणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्यानंतर रिक्षा टिळेकरनगर येथे लपवून ठेवली होती.

पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी रिक्षा जप्त करुन आरोपीसह पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसArrestअटक