शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:05 IST

पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम

ठळक मुद्देस्वाईन फ्ल्यूवरीक कार्यशाळेचे उद्घाटन पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक

पुणे : पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे. आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना पोहचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिल्या.         जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या वतीने आयोजित ‘स्वाईन फ्ल्यू आजारावर रोगनिदान उपचार व प्रतिबंध’या कार्यशाळेत नवल किशोर राम बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य सहाय्यक संचालक प्रदीप आवटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भगवान काकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी वैद्यकीय अधिकारी सदाशिव जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.    स्वाईन फ्ल्यू या आजारावरील उपचारांची अंमलबजावणी करत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून नवल किशोर राम म्हणाले, स्वाईन फ्ल्यू या आजारावर करत असलेल्या उपचार पध्दतीच्या वस्तुनिष्ठ अहवालाची नोंद सर्वांकडे असणे आवश्यक आहे.  वातावरणातील बदल व पूवार्नुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य विषयक शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष द्यावे.     स्वाईन फ्ल्यू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्यात याव्यात.तसेच शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.तसेच औषध साठयाची माहिती घेतली.

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामSwine Flueस्वाईन फ्लू