शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सापडलेले मंगळसूत्र महिलेला केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:11 IST

एका द्राक्षविक्रेत्याने आपला प्रामाणिकपणा दर्शवून सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र महिलेला परत करून समाजात आदर्श निर्माण केला आहे

नारायणगाव : कलियुगातही माणुसकी असलेली माणसे खूप भेटतात. लोभी माणसांची कमीदेखील या जगात नाही. पावलोपावली अशी माणसे भेटतात; मात्र एका द्राक्षविक्रेत्याने आपला प्रामाणिकपणा दर्शवून सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र महिलेला परत करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील बाबासाहेब मुरलीधर भोर या द्राक्षविक्रेत्याचे प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.नारायणगाव येथील इंदुमती विजय गुंजाळ या भाजी घेण्यासाठी बाजारात आपल्या मोठ्या जाऊबाई अंजली जितेंद्र गुंजाळ यांच्यासोबत गेल्या होत्या. बाजारातून घरी गेल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले.याचदरम्यान द्राक्षविक्रेते बाबासाहेब मुरलीधर भोर हे शिल्लक द्राक्षांचा कॅरेट रिकामा करीत असताना त्यांना त्यामध्ये मंगळसूत्र आढळून आले. त्यांनी लगेच मंगळसूत्र कोणाचे, हे विचारत संबंधित महिलेचा शोध सुरू केला. महिलेचा तपास न लागल्याने भोर पोलीस ठाण्यात मिळालेले मंगळसूत्र जमा करण्यास निघाले असता, वारुळवाडी येथील सबनीस विद्यामंदिरसमोर गुंजाळ फॅमिलीचे स्नेही दिलीप वारुळे, पप्पूशेठ जठार, नीलेश संते आणि घाडगे मामा हे काल (दि. ५) रात्री ८.३० वाजता मंगळसूत्राचा शोध घेत होते. भोर यांनी त्यांना ‘काय शोधताय?’ असे विचारले असता त्यांनी मंगळसूत्र हरविल्याचे सांगितले.भोर यांनी मंगळसूत्र मिळाल्याचे सांगितले. भोर यांनी सापडलेले मंगळसूत्र इंदुमती विजय गुंजाळयांच्या हवाली केले. गुंजाळ यांना मंगळसूत्र मिळाल्याचा आनंदगगनात मावेना. इंदुमती गुंजाळ व अंजली गुंजाळ यांनी भोर यांचे प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आणि कौतुक करून त्यांना २ हजारांचे रोख बक्षीस दिले.

टॅग्स :Puneपुणे