शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त मेजरने वाचवले महिला व मुलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:54 IST

आयुष्याला कंटाळून तीन लहान मुलांसह कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विवाहितेला लष्करातील एका निवृत्त मेजरने धाडस दाखवून चौघांचेही प्राण वाचवले.

ठळक मुद्देसुरेश भोसले हे १२ मराठा लाईट इन्फन्ट्रीमधून मेजर म्हणून २०१६ मध्ये निवृत्त

पुणे : आयुष्याला कंटाळून तीन लहान मुलांसह कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विवाहितेला लष्करातील एका निवृत्त मेजरने धाडस दाखवून चौघांचेही प्राण वाचवले. मेजरने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि नागरिकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर जमावातील दोघांनी कॅनॉलकडे धाव घेतली होती. ही घटना बी़ टी़ कवडे रोडवर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़. रेखा विजय लोंढे (वय २५, रा़  घोरपडी), जान्हवी लोंढे (वय ७महिने), तन्वी लोंढे (वय ६), गौरी लोंढे (वय ५) अशी त्यांची नावे आहेत. यातील सात महिन्यांची जान्हवी गंभीर असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धाडसाने प्राण वाचविणारे मेजर सुरेश भोसले, नायक सतीश गुंजाळ व विद्यार्थी अमित रावळ यांच्यामुळे या चौघांचे प्राण वाचू शकले़. याबाबतची माहिती अशी, सुरेश भोसले हे बीटी कवडे रस्त्याजवळील कॅनॉल जवळून जात होते. यावेळी त्यांच्या समोरुन एका महिला कडेवर ७ महिन्याची मुलगी तर, सोबत एक सहा वर्षाचा व एक आठ वर्षाचा मुलगा घेऊन जात होती. त्यावेळी महिलेने अचानक मुलांसह कॅनॉलमध्ये उडी मारली. हे पाहताच भोसले यांनी क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली. त्यांनी प्रथम सात महिन्याच्या बाळाला पकडून पाण्याबाहेर काढले़ यानंतर दोन्ही मुलांना पकडून पाण्यातून बाजूला घेत त्यांना एका आधारावर ठेवले आणि महिलेला वाचवायला धावले. मात्र बुडत असलेल्या महिलेने घाबरुन त्यांना मिठी मारली. यामुळे ते दोघेही बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच भोसले यांनी तातडीने महिलेला दूर ढकलले व तिचे केस धरुन उलटे पोहत पाण्याच्या कडेला आधाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यात जलपर्णी असल्याने कोणताच आधार मिळत नव्हता. तो पर्यंत कॅनोलच्या कडेला बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, त्यातील कोणीही प्रत्यक्षात पाण्यात उतरण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे महिलेला वाचवण्यासाठी भोसले यांनी नागरिकांना अंगावरील जॅकेट एकमेकांना बांधून रस्सी तयार करण्याचे आवाहन केले. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान भासले यांना अखेर एक मुरुमाच्या टेकाडाचा आधार मिळाला. त्यांनी महिलेला त्यावर ठेऊन तिच्या पोटातील पाणी काढले. त्यानंतर तिला कॅनोलमधून बाहेर काढण्यासाठी नायक सतीश गुंजाळ व विद्यार्थी अमित रावळ यांनी मदत केली. कडेला आणल्यावर नागरिकांनी त्यांना रिक्षातून रुग्णालयात नेले. तोवर अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरेश भोसले यांनी वेळीच धाव घेतल्याने चौघांचेही प्राण वाचू शकले़. सुरेश भोसले हे १२ मराठा लाईट इन्फन्ट्रीमधून मेजर म्हणून २०१६ मध्ये निवृत्त झाले़ ते सध्या बी़ टी़ कवडे रोडवर रहात आहेत़. आज दुपारी ते कॅनॉलजवळून जात असताना लोकांचा आरडाओरडा ऐकून तेव्हा एक महिला वाहत जात असल्याचे पाहिल्यावर पाण्यात उडी मारुन त्यांचा जीव वाचविला असे भोसले यांनी सांगितले़. 

टॅग्स :Puneपुणे