शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पुण्यात निर्बंध कडक, अकोला-बुलडाण्यात शिथील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 02:26 IST

पुणेकर रात्री दहाच्या आत घरात; नागपुरात आजपासून ९ दिवस कडक लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/अकोला : लॉकडाऊन लागणार का, याबद्दल पुणेकरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असणारा संभ्रम शुक्रवारी दूर झाला.  उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मात्र पुणे पूर्ण लॉक केले जाणार आहे. दुसरीकडे अकोला आणि बुलडाणा या विदर्भातील दोन शहरांत मात्र शनिवार-रविवार या दोन दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीत शिथीलता देत फक्त रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

पवार यांनी पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. उद्यानेही संध्याकाळी बंद ठेवण्याची सूचना केली. लग्न समारंभ, इतर कार्यक्रमांना ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा आहे. बाजारपेठा, मॉल, चित्रपटगृहेदेखील रात्री दहापर्यंतच सुरू राहतील. रेस्टॉरंट्स फक्त ५० टक्के उपस्थितीतच चालू ठेवा, अशी ताकीद पवारांनी दिली. 

अकोला :  संपूर्ण बंदचा आदेश मागे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण बंदचा आदेश मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील मात्र, सायंकाळपासून संचारबंदी कायम असणार आहे. 

नागपूर : गाेरेवाडा जंगल सफारीही ‘लाॅकडाऊन’ शहरातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय व जंगल सफारी येत्या १५ ते २१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. महापालिका तसेच जिल्हाधिकारी यांनी शहरात लावलेल्या टाळेबंदीच्या निर्णयानंतर वनविभागातर्फे गाेरेवाडाचे गेटही पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. 

जळगाव  : पुन्हा एकदा ठप्प, बाजारपेठ बंद१२ ते १४ मार्च दरम्यान तीन दिवसीय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यासह नागरिकही घराबाहेर न पडल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील मंडळी व प्रवासीच रस्त्यावर दिसत असल्याचे पहिल्या दिवशी चित्र होते.  

नाशिक : कठोर निर्बंधाचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेतजिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नाशिककरांकडून बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले. 

परभणी : दोन दिवस संचारबंदीजिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील नागरी भागात शनिवार व रविवार अशी दोन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ मार्चच्या सकाळी ६ वाजेपर्यंत परभणी महानगरपालिका क्षेत्र व ५ किमीचा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायती आणि परिसरातील ३ किमीचा परिसर या भागात संचारबंदी लागू केली आहे.  

शेगाव : पाॅझिटिव्ह रुग्णांचा संतापशु्क्रवारी सकाळचे जेवण दुपारी दोन वाजेपर्यंतही न आल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरच्या परिसरात येत संताप व्यक्त केला. केवळ सिलिंडर संपल्याने जेवणास उशीर झाल्याचे समजले. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPuneपुणेbuldhanaबुलडाणा