शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सायकल शेअरिंगला प्रतिसाद, स्मार्ट सिटीची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 04:00 IST

पुण्याच्या वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे.

पुणे -  पुण्याच्या वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे. यावर उपाय शोधून पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत सायकल शेअरिंग योजना शहरात राबविण्यात येत असून, या योजनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एक रुपया अर्ध्या तासासाठी या पद्धतीने या सायकली वापरण्यास मिळत असल्याने पुणेकर आवर्जून या सायकलीची रपेट मारत आहेत.पेडल या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत असून, सध्या औंध, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्ता व या भागात ही योजना राबविण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्याार्थ्यांबरोबरच शहरात कामानिमित्त येणाºया नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ही योजना सुरू करण्यात आली. तिला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने शहराच्या इतर भागांत ही योजना राबविण्यात येत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सायकल स्टेशन तयार करण्यात आली असून, तेथून सायकल वापरण्यास मिळते. सायकल ही पेडल या कंपनीच्या संकेतस्थळावरून किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून भाड्याने घेता येते. यासाठी मोबाईलमध्ये पेटीयम असणे आवश्यक आहे. या सायकल चालविण्यास सोप्या आहेत तसेच सामान ठेवण्याचीसुद्धा त्यात व्यवस्था करण्यात आली असल्याने महिलांचा प्रतिसादही चांगला आहे. सायकल एका स्टॅँडवरून घेतल्यानंतर ती दुसºया एखाद्या स्टँडवरच लावणे आवश्यक आहे. स्टँडची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या सायकलींना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली असल्याने ही सायकल कुठे आहे, हे कळण्यास मदत होते.नागपूरहून पुण्याला फिरण्यासाठी आलेला पीयूष आगरवाल म्हणाला, ‘‘नागपूरहून पुण्याला फिरण्यासाठी आलो आहे. इथे आल्यानंतर या सायकल योजनेचे माहिती मिळाली. ही सायकल भाड्याने घेणे अगदी सोपे आहे. दोन दिवसांपासून आम्ही या सायकलच्या माध्यमातूनच फिरत आहोत. नागपूरमध्येही योजना लवकर सुरू व्हावी’’ पुण्यात शिक्षणासाठी आलेला उज्ज्वल पाटील म्हणाला, ‘‘मी मॉडर्न महाविद्यालयात शिकतो. तेथून विविध ठिकाणी जाण्यासाठी मला या सायकलचा उपयोग होतो.’’ नाममात्र दरात या सायकल उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. शहराच्या इतर भागातही ही योजना राबवायला हवी.मी गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेते. मला या सायकल योजनेमुळे खूप फायदा झाला आहे. व्यायामासाठी तसेच इतर कामांसाठी मी या सायकलचा वापर करते. यात सामान ठेवण्यासाठी कॅरेज असल्याने अडचण होत नाही.- तेजस्विनी जाधव, विद्यार्थिनी४या सायकल योजनेला चांगला प्रतिसाद जरी मिळत असला, तरी काही समाजकंटकांकडून या सायकलींची तोडफोड करण्यात येत आहे. तसेच, स्टँड ऐवजी वेगळ्या ठिकाणी या सायकल सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाºयांना या सायकल कोठे आहेत ते शोधून पुन्हा स्टँडवर आणाव्या लागतात. तसेच, तोडफोड केली असल्यास तिची डागडुजीही करावी लागते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या