शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भितीच्या वातावरणाला रस्त्यावर उतरून युवकांचे प्रत्युत्तर ; अरूणा रॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:57 IST

देशभरातील युवक आज रस्त्यावर उतरून फॅसिझमवर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. हा विरोधकांचा ड्रामा नसून युवकच स्वत:हून पुढे आले आहेत. यामाध्यमातून युवकांनी देशातील भितीच्या वातावरणाला प्रत्युत्तर दिले आहे

पुणे : ‘देशभरातील युवक आज रस्त्यावर उतरून फॅसिझमवर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. हा विरोधकांचा ड्रामा नसून युवकच स्वत:हून पुढे आले आहेत. यामाध्यमातून युवकांनी देशातील भितीच्या वातावरणाला प्रत्युत्तर दिले आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्या अरूणा रॉय यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला तरूणाईकडून होत असलेल्या विरोधाचे समर्थन केले. तसेच केंद्र शासनाने हा कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती अधिकारात मागविलेली माहिती दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.अरूणा रॉय यांच्या ‘द आरटीआय स्टोरी’ या पुस्तकाच्या ‘कहाणी माहिती अधिकाराची’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. याप्रसंगी रॉय व त्यांचे सहकारी निखील डे यांच्याशी अभिनेत्री वीणा जामकर हिने संवाद साधला. तत्पुर्वी, ‘दलपतसिंग येती गावा’ या माहिती अधिकारावर आधारीत नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे, मकरंद साठे यांच्यासह राजकुमार तांगडे, वीणा जामकर, अश्विनी भालेकर व सभाजी तांगडे यांनी या नाटकाविषयीचे अनुभव सांगितले. नाटकाची निर्मिती प्रक्रिया व नाट्य संहितेवरील पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. साधना प्रकाशनचे संपादक विनोद शिरसाट यावेळी उपस्थित होते. अवधूत डोंगरे यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.रॉय म्हणाल्या, सध्या अर्बन, बुध्दीवादी, न्याय, नागरिक, समानता हे शब्द उच्चारण्यास नको वाटते. कारण त्यापुढे लगेच नक्षली,  डावे, पाकिस्तानी, दहशतवादी असे शब्द जोडले जात आहेत. देशातील अव्यवस्थेला असे विचार समोर आणतात. गोरक्षकांकडून झुंडशाही करून लोकांना मारले जात आहे. सर्व नीतीमुल्ये पायदळी तुडविली जात आहेत. त्यामुळे आज पुन्हा अहिंसा या विचारांकडे जाण्याची गरज वाटते. युवकांनी आशावाद निर्माण केला असून तो सोडता कामा नये. लोकांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी व्यासपीठ निर्माण करायला हवे. सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदानासारखे प्रयोग करायला हवेत. ‘आरटीआय’ हा कायदा लोकशाही, संविधानाचा उत्सव आहे. मानवी हक्क अबाधित ठेवण्यासाठी या कायद्याचा अधिकाधिक वापर व्हायला हवा.आरटीआय हे एक जनआंदोलन असून सरकार जाब विचारण्यासाठी लोकांच्या हातातील हत्यार आहे. न्यायव्यवस्थाही सरकारच्या पुढे झुकते. कलम ३७०, काश्मीर स्थिती, जेएनयु, सीएए याबाबत न्यायालयाने ऐकूनही घेतले नाही. त्यामुळे आपण न्यायव्यवस्थेवरही अवलंबून राहू शकत नाही, असे डे यांनी नमुद केले.

कायदे हे कोणत्याही गुन्हांवर आळा घालण्यासाठी असतात. पण मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यावर हे गुन्हे थांबत नाहीत. सूड आणि न्यायात फरक असून, मृत्यूदंड हे गुन्ह्यांना आळा घालण्याचे उत्तर नाही, असे स्पष्ट करत अरुणा रॉय यांनी फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शविला. देशात हिंसेची विकृती वाढत असल्याने पुन्हा असिंहा देशाच्या केंद्रस्थानी असायला हवी. नथुराम गोडसेचे आज मंदिर उभारले जात आहे. मग कोण जिंकले आणि कोण हरले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता