शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

शहिदांना आदरांजली..

By admin | Updated: November 26, 2014 23:52 IST

शहरांमध्ये विविध संघटनाच्या वतीने मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या नागरिकांना व पोलीस अधिका:यांना आदरांजली वाहण्यात आली.

पुणो : शहरांमध्ये विविध संघटनाच्या वतीने मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या  नागरिकांना व पोलीस अधिका:यांना आदरांजली वाहण्यात आली.
संस्कृती डेव्हलपर्स कंपनीतील कर्मचारी व व्यवस्थापनाच्या वतीने कॅम्प ऑफिसमध्ये 26/11 शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी एम.डी ला. हेमंत मोटाडो, कुकराज गोडा आदी उपस्थित होते.
पुणो शहर पोलीस व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने 26/11 तील शहिदांच्या प्रतिमेस अतिरिक्त पोलीस अधिकारी शहाजी सोळुंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शालेय विद्याथ्र्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पुण्यातील 1क्9 शाळांमधील 5 हजार 392 विद्याथ्र्यानी सहभाग घेतला होता. या वेळी मोठय़ा प्रमाणात देशभक्तांनी श्रद्धांजली वाहिली.
नेक्सजेन ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी (सी.एम.डी) अभिषेक बर्मन, एच.आर डायरेक्टर शबनम प्रवीण, स्वप्निल सिरसाट आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना यांच्या वतीने 26/11 मध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. तसेच धनकवडी येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना गुलाबपुष्प देऊन त्याच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी जयराज लांडगे, संतोष चव्हाण, अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.
कष्टकरी कामगारांच्या वतीने 26/11 ला शहीद झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचा:यांच्या वतीने आम्हाला  पोलिसांचा अभिमान वाटतो हे श्रद्धांजलीपर निवेदन ए.डी.सी. दैठणकर यांना देण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कष्टकरी बांधव, शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते. ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट व बजरंगी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने 26/11 च्या वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या. या वेळी अध्यक्ष सनमित सिंग चौधरी, ऑल इंडिया अँटीटेरिरस्ट फ्रंट, पुणो शहर व बजरंगी मोरया प्रतिष्ठानचे संस्थापक उपस्थित होते.  (प्रतिनिधी)
 
1 अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे, देशाचा मान शहिदांचा सन्मान, अशा घोषणा देत ब्राव्हो ग्रुपच्या वतीने दहशतवादी हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाल्याने   शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महर्षी कव्रे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती बकुळा तांबड इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थिनी पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.
2 या पदयात्रेस बालगंधर्व रंगमंदिर चौकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला. 
3 जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बेवारस वस्तू असल्यास पोलिसांना कळवावे, अनोळखी व्यक्तीपासून सावधगिरी बाळगावी, गुन्हेगारीला आळा घाला, कोणालाही दोष          देण्यापेक्षा आपली सामाजिक कामे, कर्तव्ये जबाबदारीने करावीत, असे फलक विद्यार्थिनींच्या हातात होते.
4 मोठय़ा उत्साहाने या विद्यार्थिनी शांतीचा संदेश देण्यासाठी पांढरे कपडे परिधान करून पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या, तर शेवट गुडलक चौकात शहिदांच्या  प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. 
5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, गरवारे महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन अशोक गिरी, भगवान      कडू आदी उपस्थित होते.
 
विद्याथ्र्याकडून श्रद्धांजली 
4आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयामधील एन.एस.एस. विभागाच्या वतीने 26/11 मधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्या वर्षा शर्मा यांनी शहिदांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण केले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे, एनएसएस प्रतिनिधी हर्षदा श्रॉफ, अनुज पाठक, शुभम गिजरे, योगिता लायगुडे आदी उपस्थित होते. 
 
4मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील 
शहीद झालेल्या वीरांना शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज श्रद्धांजली अर्पण केली.  शहीद अशोक कामटे, हेमंत करकरे व विजय साळसकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती 
प्रज्वलित करण्यात 
आली. 
4काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक सुधीर जानज्योत, अंजनी निम्हण, कृष्णकांत जाधव, सचिन आडेकर आदी उपस्थित होते.