शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

टाटा, एचए औद्योगिक कंपन्यांच्या मोकळ्या जागांवर रहिवासी झोनचे आरक्षण प्रस्तावित

By विश्वास मोरे | Updated: June 2, 2025 13:44 IST

पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील औद्योगिक आरक्षणे विकास आराखड्यात बदलली : भोसरी ते बर्ड व्हॅली रस्त्यावरील 'एमआयडीसी'च्या पेठांमध्ये रहिवासी झोनचे नियोजन; शेती, ना विकास हरित पट्टे असलेल्या झोनच्या जागा झाल्या रहिवासी 

पिंपरी : मोकळ्या जागा आणि विद्यमान जागांचा वापर हे सूत्र प्रारूप विकास आराखडा तयार करण्यास वापरण्यात आले आहे. त्यामुळे औद्योगिकनगरी म्हणून विकसित झालेल्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी परिसरातील औद्योगिक आरक्षणे बदलली असल्याचे दिसून येते. पुणे-मुंबई महामार्गावर असणाऱ्या पिंपरीतील एचए कंपनीची मैदानाच्या बाजूची जागा रहिवासी झोन म्हणून नमूद केली आहे. तसेच भोसरी रस्त्यावरील टाटा मोटर्सची सुमंत सरोवराची जागा रहिवासी झोन दर्शविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास आराखड्यास १९९७ त्यानंतर २००८ व २००९ मध्ये शासनाने अंतिम मान्यता दिली होती. वीस वर्षानंतर विकास आराखडा सुधारित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१९ मध्ये विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात जुनी आरक्षणे बदलण्यात आली आहेत.  

मोकळ्या जागांवर आरक्षणजीआयएस प्रणालीद्वारे आराखडा तयार करण्यासाठी अहमदाबाद, गुजरात येथील एचसीपीची नेमणूक केली होती. त्यांनी एजन्सीने उपग्रह प्रतिमा, ड्रोन व टोटल स्टेशनच्या माध्यमातून जमिनीचे सर्वेक्षण केले. विद्यमान जमिनींचा वापर लक्षात घेऊन आराखडा आणि नकाशा बनविण्यात आला आहे. मात्र, जुन्या आराखड्यातील आरक्षणे कमी केली आहेत. या ठिकाणी केले बदलआकुर्डीतील सर्वे नंबर ५१४ जागा, खंडोबा माळ सर्वे १६२ मधील जागेत रहिवासी झोन दाखवण्यात आला आहे. भोसरी ते बर्ड व्हॅली रस्त्यावरील एमआयडीसीच्या पेठांमध्ये रहिवासी झोन दर्शवला आहे. सर्वे नंबर ८७ मध्ये ट्रक टर्मिनस आरक्षण प्रस्तावित केले आहे. रेल्वे आणि एम्पायर इस्टेटच्या मागील भागामध्ये मिश्र आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील एचए कंपनीच्या समोरील जागेमध्ये रहिवासी झोन आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड