शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पुणे पोलीस आयुक्तालयात फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:44 IST

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलीस आयुक्तालयात काही फेरबदल करण्यात आले आहेत. आता पुणे पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे असणार आहेत.

पुणे  - स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलीस आयुक्तालयात काही फेरबदल करण्यात आले आहेत. आता पुणे पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे असणार आहेत. प्रत्येक परिमंडळात सहा पोलीस ठाणी असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ही पुनर्रचना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली.१५ आॅगस्टपासून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात ३० पोलीस ठाणी येतात. तीन परिमंडळांमध्ये या पोलीस ठाण्यांचे काम सुरू होते. मात्र, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर ग्रामीणमधील काही पोलीस ठाणी शहरात येऊ घातली आहेत, तर काही नवीन पोलीस ठाण्यांची निर्मितीही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची सोय व्हावी व गुन्ह्यांना आवर घालता यावा यासाठी पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे निर्माण करण्यात आली आहेत. या परिमंडळांमध्ये प्रत्येकी सहा पोलीस ठाणी असतील. दरम्यान, गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुणे शहर आयुक्तालयात बैठक झाली़ त्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात मनुष्यबळ, कार्यालय आदीबाबत चर्चा केली. परकीय नागरिक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्याकडे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट ५ किंवा वाहतूक विभाग, मगरपट्टा या इमारतीमध्ये परिमंडळ पाच उपायुक्त यांचे कार्यालय सुरू होईल. तर परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांचे कार्यालय नवीन जागा मिळेपर्यंत फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीत असेल.१ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारीवर्गपुणे पोलीस आयुक्तालयातील १ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. पिंपरीतील आधी कार्यरत असलेले १ उपायुक्त, १ सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक, ६७ उपनिरीक्षक, ११५ सहायक फौजदार, ३६१ हवालदार, ४२५ पोलीस नाईक आणि ६१६ पोलीस शिपाई वर्ग करण्यात आले असून, अद्याप दोनशे पोलीस कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्या बदल्यात गार्ड, एस्कॉर्ट, कैदी पार्टी, खासदार, आमदार संरक्षण, आरसीपी, व्हीआयपी दौरे आदींसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे, असे प्रशासन पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले.अशी असेल परिमंडळनिहाय रचनापरिमंडळ १: समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, डेक्कन आणि शिवाजीनगरपरिमंडळ २: सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, बंडगार्डन, लष्कर, कोरेगाव पार्कपरिमंडळ ३ : कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगड रोड, अलंकारपरिमंडळ ४ : खडकी, विश्रांतवाडी, चतु:शृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ आणि लोणी कंद (प्रस्तावित)परिमंडळ ५ : हडपसर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर (प्रस्तावित)

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या