शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची सुखरूप सुटका, अग्निशामक दलाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:24 IST

भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नसते़ प्रेमाचा, आपुलकीचा एक स्पर्शही खूप काही सांगून जातो, याचा प्रत्यय गुरुवारी अग्निशामक दलाच्या जवानांना आला़ वानवडी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत अडकलेल्या एका ७ वर्षांच्या मुलाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली़

पुणे - भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नसते़ प्रेमाचा, आपुलकीचा एक स्पर्शही खूप काही सांगून जातो, याचा प्रत्यय गुरुवारी अग्निशामक दलाच्या जवानांना आला़ वानवडी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत अडकलेल्या एका ७ वर्षांच्या मुलाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली़ या मुलाचे पालक अरबी असून त्यांना अरबी भाषेशिवाय अन्य कोणीच भाषा येत नसल्यामुळे मुलाची सुटका केलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांशी प्रेमाने हात मिळवून त्यांचे आभार मानले़ही घटना वानवडी येथील स्टेप इन हॉटेलसमोर एका इमारतीत गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मुलगा गॅलरीत अडकल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. दलाकडून कोंढवा (खुर्द) अग्निशमन केंद्रातील गाडी रवाना करण्यात आली. मुलगा गेले तीन तास फ्लॅटच्या मुख्य दरवाजास कुलूप लागल्याने व पालक बाहेर गेल्याने गॅलरीत अडकला होता. या इमारतीत पोहोचताच अग्निशमन दलाचे जवान राहुल बांदल यांनी परिस्थिती पाहून तिसºया मजल्यावरील एका फ्लॅटच्या गॅलरीतून मुलाला आवाज देत मुलगा सुखरूप असल्याची खात्री केली. जवान बांदल यांनी तिसºया मजल्यावरील गॅलरीतून एका सज्जाचा आधार घेत धाडसाने चौथ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला व अवघ्या पाच मिनिटांत मुलाची सुखरूप सुटका केली. गॅलरीत प्रवेश करताच मुलाच्या चेहºयावर नकळतच हास्य उमटले. जवान बांदल यांनी मुलाला घेऊन मुख्य दरवाजा उघडला. त्याच वेळी या मुलाचे पालक परतले व मुलाला जवान बांदल यांनी उचलून घेतलेले पाहून पालकांना गहिवरून आले. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.अग्निशमन दलाचे चालक दत्तात्रय वाघ तसेच जवान राहुल बांदल, संदीप जगताप यांना वेगळाच अनुभव आला. मुलाचे पालक अरबी असून त्यांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणतीच भाषा समजत नव्हती. जवान बांदल यांनी त्यांना नाव विचारले असता त्यांनी प्रत्युत्तरार्थ फक्त ‘अरबी अरबी’ असे म्हटले. सदर कुटुंब हे अरबी असून त्यांना अरबी भाषेशिवाय कोणतीही भाषा येत नसावी, असा अंदाज घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून मुलाचे नाव महमुद्दीन हकामे (वय ७) असल्याचे समजले होते.

टॅग्स :Puneपुणे