शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव येथील रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह; बारामतीकरांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:27 IST

शहरात आजपर्यंत एकुण दहा कोरोना रुग्ण सापडले आहेत.

ठळक मुद्दे१२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामती तालुक्याची वाटचाल ऑरेंज झोनच्या दिशेने

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव बु येथील  दहाव्या रुग्णाच्या संपकार्तील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली . गुरुवारी(दि. १४)सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार रुग्णाच्या कुटुंबातील तिघांजणासह १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . मंगळवारी (दि. १२) तालुक्याच्या ग्रामीण भागात तिसरा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेला दुसरा रुग्ण आहे. ग्रामीण भागातील तिसरा तर, बारामती परिसरातील हा दहावा रुग्ण आहे. शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ  येथे आजपर्यंत एकुण दहा सापडले आहेत.त्यापैकी भाजीविकेता असणाऱ्या  रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा यापुर्वी मृत्यु झाला आहे. तसेच बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्तझाले आहेत. आठव्या रुग्णाला ३० एप्रिल रोजी ' डिस्चार्ज ' देण्यात आला आहे. नवव्या कटफळ येथील रुग्णावर मुंबई येथे उपचार सुरु असतानाच माळेगाव बु. येथील कुटुंबाला भेटण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट  झाले. ती व्यक्ती व्यवसायाने वायरमन असून पुणे येथे महावितरणमध्ये नोकरीस आहे. दिनांक ८ मे रोजी माळेगाव बुद्रुक येथे आपल्या राहत्या घरी ते आले होते. त्यांचा पुणे शहरातील एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बारामतीत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात हाय रिस्क कॉन्टॅक्ट तपासणीमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.प्रशासनाने त्या रुग्णाच्या कुटुंंबातील तिघांसह एकुण १२ जणांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतले होते.त्यापैकी त्या रुग्णाची पत्नी,दोन मुलांचा देखील समावेश होता .माळेगांव येथील दहाव्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरु आहेत.त्या रुग्णाच्या संपकार्तील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामती तालुक्याची ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल सुखद होणार आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवार