शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील दादावाडीत शत्रुंजय गिरीराज मंदिराची प्रतिकृती; शुक्रवारी होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:41 IST

सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देसोहळ्यास सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरापासून शोभायात्रेने होणार प्रारंभदादावाडी मंदिरात साकारण्यात आली शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

पुणे : श्री जैन श्वेतांबर दादावाडी  टेम्पल ट्रस्टतर्फे सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे  उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) सकाळी १० वाजता विजय रामचंद्रसुरीश्वरजी म. सा. यांचे शिष्य परमपूज्य मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास शोभायात्रेने प्रारंभ सकाळी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरापासून होणार आहे. शोभायात्रेची सांगता दादावाडी मंदिराजवळ होणार आहे. या शोभायात्रेत मंदिराचे ट्रस्टी, पदाधिकारी, जैन समाजातील हजारो भाविक, नागरिक सहभागी होणार आहेत. गुजरातमधील पालिताना येथील श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या तीर्थस्थानास लाखो भाविक भेट घेऊन दर्शन घेतात. श्रद्धा आणि कलेच्या दृष्टीने हे तीर्थ मंदिर जैन समाजाचे सर्वोच्च स्थान आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांनी ९९ वेळा या तीर्थ मंदिरास भेट दिली होती. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे. चैत्र आणि कार्तिकी पौर्णिमेस हजारो जैन साधू, साध्वी यांचे महानिर्वाण  या पवित्र स्थानी झाले आहे. अनेक भाविकांनी आपल्या मनाचा क्रोध, द्वेष, मोह, माया, लोभ यावर मात केली. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे नाव शत्रुंजय पडले आहे. हे तीर्थ मंदिर जमिनीपासून २ हजार फूट उंचीवर आहे. या ठिकाणी ७०० मंदिरे व हजारो प्रतिमा आहेत. या तीर्थ मंदिराकडे वाट चालून वर जावे लागते. या रस्त्यावर सुमारे ३,७५० पायºया आहेत.

मंदिरासाठी झटले कोलकाताचे कलाकार शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दादावाडी मंदिरात साकारण्यात आली आहे. या मंदिराच्या कलाकृतीची प्रतिकृती तयार करण्यासाठी कोलकाता येथील ३० ते ३५ कलाकार गेली १ ते दीड वर्ष झटत होते. या मंदिरात तलाट्टी, नौतूण्क, दादाचा दरबार, कुंड, विश्रामस्थळ, पादुका (पगलियाजी), दर्शनीय स्थळांची प्रतिकृती उभारण्यात आली असल्याची माहिती संपत जैन यांनी कळविली आहे. 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरPuneपुणे